बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे लाखो चाहते आहेत. श्वेताचा भाऊ अभिषेक बच्चनने याबाबत खुलासा केला आहे. श्वेता अभिनेता सलमान खान आणि अभिनेता आमिर खानची फॅन होती. याबाबत आमिर खानला जेव्हा कळाले तेव्हा त्याने श्वेताला पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचे अभिषेकने सांगितले आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिषेकने बहिण श्वेताशी संबंधीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. जेव्हा सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती. तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट ऑडीओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ती ऐकायची. इतकच नव्हे तर तिने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्रेंड लिहिलेली कॅप देखील अभिषेकडे मागितली होती.
View this post on Instagram
आणखी वाचा- ‘आमच्या मुलीचे फोटो काढू नका’, विराट-अनुष्काने केली विनंती
दरम्यान अभिषेकने सांगितले की श्वेता अभिनेता आमिर खानची देखील फॅन होती. जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 3:36 pm