News Flash

जिमनॅस्टिक रिंगवर वर्कआउट करण्यात आमिरची लेक दंग; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा, इराचा थक्क करणारा वर्कआऊटचा व्हिडीओ

बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान. अनेक वेळा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत येणारी इरा यावेळी वर्कआऊटमुळे चर्चेत आली आहे. इराने जिमनॅस्टिक रिंगवर वर्कआउट करतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

इरा सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती अनेक वेळा फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अनेक वेळा इरा तिच्या बोल्ड लूक आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ती तिच्या वर्कआऊटमुळे चर्चेत आली आहे. इरा जिमनॅस्टिक रिंगवर वर्कआऊट करत असून अत्यंत कठीण प्रकारे ती हा वर्कआऊट करत आहे. त्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.


दरम्यान, इराचं हे वर्कआऊट अनेकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 11:58 am

Web Title: aamir khans daughter gymnastic workout video viral ssj 93
Next Stories
1 नव्या जाहिरातीमुळे सैफ-करीना चर्चेत; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
2 कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महेश भट्ट, करण जोहर सोशल मीडियावर ट्रेण्ड
3 बिग बींचे करोनाविषयी जागृती करणारे ‘ते’ होर्डिंग्स हटविले; कारण…
Just Now!
X