25 October 2020

News Flash

आमिर खानचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आमिरच्या मुलाला आहे अभिनयाची आवड

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे जुनैद खान. बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक स्टारकिडचं पदार्पण झालं. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या लेकाचं बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पुर्ण होणार आहे. जुनैद देखील येत्या काही काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अवश्य पाहा – अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

अवश्य पाहा – निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जुनैद ‘इश्क’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाची पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.

जुनैदला अभिनयाची प्रचंड आवड आहे. सध्या तो जर्मनीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. विशेषत: त्याला चित्रपटांऐवजी रंगभूमीवर काम करण्यात अधिक रस आहे. आजवर त्याने अनेक इंग्रजी आणि जर्मन भाषेतील नाटकांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटात त्याने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 5:56 pm

Web Title: aamir khans son junaid is ready for his bollywood debut mppg 94
Next Stories
1 माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…
2 “पवित्राच्या नादाला लागू नकोस तुझं करिअर संपेल”; एक्स बॉयफ्रेंडचा अभिनेत्याला सल्ला
3 “माझ्या खात्यात भरपूर पैसे आहेत काळजी नसावी”; आदित्य नारायणचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर
Just Now!
X