News Flash

आमिरची ‘धूम’ बाइक सुसाट, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला टाकले मागे

बॉलिवूडमधील 'मिस्टर परफेक्‍शनिस्ट' आमिर खानच्या भूमिकेमुळे बहुचर्चित असलेल्या 'धूम ३' चित्रपटाने तिकीट बारीवर पहिल्या दिवशीचा बादशाहा शाहरुखच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

| December 21, 2013 02:37 am

बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ आमिर खानच्या भूमिकेमुळे बहुचर्चित असलेल्या ‘धूम ३’ चित्रपटाने तिकीट बारीवर पहिल्या दिवशीचा  बादशाहा शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.  
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३५ कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी हा विक्रम शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या नावावर होता. चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाने पहिल्या दिवशी ३३.१२ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘धूम ३’ चित्रपट भारतातील सुमारे साडेचार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
आमिर खानने साकारलेला खलनायक, बाईक स्टंट्स, कतरीना कैफ आणि चित्रपटातील गाणी यामुळे, हा चित्रपट चर्चा आणि उत्सुकतेचा  चित्रपट बनला आहे. आमिर खानसह, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा यांची या चित्रपटात भूमिका आहे. ‘धूम’च्या या तिसऱ्या सिक्वलमध्ये सुसाट वेगाने धावणाऱ्या ‘रेसर बाईक्‍स’ पाहायला मिळणार आहेत. आमिर खान याची आगळीवेगळी भूमिका, तसेच हॉलिवूडच्या धर्तीवर असणारे स्पेशल इफेक्‍ट्‌स हे ‘धूम ३’चे खास वैशिष्ट्य असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 2:37 am

Web Title: aamirs dhoom 3 broke chennai express box office record
टॅग : Chennai Express
Next Stories
1 सलमान, बिग बॉस निर्मात्यांविरुद्ध खटला
2 ‘आपल्या कलेचा डांगोरा आपणच पिटण्याचे युग’
3 ‘धूम ३’ का बघावा याची पाच कारणे..
Just Now!
X