01 October 2020

News Flash

आराध्या बच्चन घेते ऑनलाइन हिंदी विषयाचे धडे, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ...

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन सध्या चर्चेत आहे. या चर्चा तिचा हिंदी भाषेचे ऑनलाइन शिक्षण घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहता आराध्या आजोबांप्रमाणे सर्व भाषा शिकताना दिसत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वच मुले सध्या ऑनलाइन शिक्षण घेताना दिसत आहेत. त्यामुळे आराध्या बच्चन देखील ऑनलाइन शिक्षण घेत आहे. तिचा हिंदी भाषेचे ऑनलाइन शिक्षण घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

Ma Baby Girl #AaradhyaBachchan Stay healthy… . . . . #aaradhyabachchan #aaru #aishwaryaraibachchan #abhishekbachchan

A post shared by AbhiAsh_IndoFc (@abhiash_indofc) on

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आराध्या हिंदी कविता बोलताना दिसत आहे. तसेच कविता बोलून झाल्यावर ती शिक्षकांचे आभार मानताना दिसत आहे. आराध्याचा हा व्हिडीओ ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनच्या फॅन पेजने शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबातील आराध्या, ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांना करोनाच संसर्ग झाला होता. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांनी सर्वांनी करोनावर मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 11:51 am

Web Title: aaradhya bachchan taking online hindi classes avb 95
Next Stories
1 सुशांत आणि दिशाने केली होती ‘पब्जी’बद्दल चर्चा; समोर आला दोघांमधील Whatsapp संवाद
2 “मी तर भगवान दादांचा मुलगा”; श्रीदेवी आणि हृतिक यांचा ३४ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल…
3 माजी मिस इंडियाला करोनाची लागण; पुण्याहून मुंबईत आल्यावर दिसून आली लक्षणं
Just Now!
X