बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा म्हणजेच आराध्याचा आज चौथा वाढदिवस आहे. चाहत्यांकडून आराध्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अभिषेकनेही आपल्या लाडक्या लेकीला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. आराध्याचे स्केच काढलेला फोटो त्याने ट्विट केला आहे.
Happy birthday my little angel!! This beautiful sketch is made by the super talented @fifipewz thank… https://t.co/1iRqzs98MF
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) November 16, 2015
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या आपल्या आई-वडिलांपेक्षा बेबी आराध्या माध्यमांमध्ये आकर्षणाचा विषय असून, आई-वडिलांपेक्षा अधिक प्रमाणात ती प्रसिध्दीच्या झोतात असते. या पार्टीला बॉलीवूड सेलिब्रेटींच्या मुलांनी उपस्थिती लावली होती. गेल्यावर्षी आराध्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. यात हृतिकची दोन्ही मुले रिहान-रिदान, आमिर-किरणचा मुलगा आझाद, शिल्पा शेट्टीचा मुलगा आणि काजोलची दोन्ही मुले उपस्थित होती. तिच्या तिस-या वाढदिवसाला अंबानींकडून विशेष केक भेटस्वरुपात देण्यात आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 3:20 pm