16 December 2017

News Flash

बिग बींच्या वाढदिवशी आराध्या देणार ‘ही’ खास भेट

११ ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 2:07 PM

११ ऑक्टोबर रोजी आहे बिग बींचा वाढदिवस

११ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यांचा हा वाढदिवस कसा असेल, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीला लागली आहे. एकीकडे फिल्म सिटीमध्ये बिग बी बॉलिवूड कलाकारांसाठी स्पेशल डिनर आयोजित करणार असल्याची चर्चा असतानाच, बच्चन कुटुंबीय त्यांच्या वाढदिवशी मालदीवला जाणार असल्याचं वृत्त ‘मिड डे’ या वृत्तपत्राने दिलं आहे.

१० ऑक्टोबर रोजी संपूर्ण बच्चन कुटूंब मालदीवला जाणार आहे. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, जया बच्चन, श्वेता आणि तिची दोन्ही मुलं असं संपूर्ण बच्चन कुटूंब बिग बींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालदीवमध्ये सुट्ट्यांची मज्जा घेणार आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याने या सर्व गोष्टींचं नियोजन केलं असून आठवडाभर ते तिथेच राहणार आहेत. विशेष म्हणजे आराध्याने तिच्या आजोबांसाठी म्हणजेचं बिग बींसाठी स्वत: एक खास भेटकार्ड तयार केलं आहे. हे भेटकार्ड ती त्यांना वाढदिवशी देणार आहे.

Triple A!! @jaipur_pinkpanthers #BestSupport

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

वाचा : शाहरूखला नाराज करणारं विद्या बालनचं हे वक्तव्य

बिग बींना आपल्या वाढदिवशी संपूर्ण वेळ फक्त त्यांच्या कुटुंबाला द्यायचं आहे आणि मुंबईत राहून हे शक्य झालं नसतं. म्हणूनच ऐश्वर्या- अभिषेकने त्यांच्यासाठी मालदीव ट्रीपचा प्लॅन केला आहे. गेल्या वर्षी अभिषेक बच्चनचा ४० वा वाढदिवससुद्धा बच्चन कुटुंबीयांनी मालदीवमध्ये साजरा केला होता.

These two. ❤️

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

First Published on October 4, 2017 2:07 pm

Web Title: aaradhya to give a special gift to her grandfather amitabh bachchan on his birthday