18 October 2019

News Flash

सख्ख्या बहिणीकडून बलात्कार; अमेरिकन पॉप सिंगरचा धक्कादायक खुलासा

ट्विटरच्या माध्यमातून त्याने हा गौप्यस्फोट केला आहे.

अॅरॉन कार्टर

सख्ख्या बहिणीने माझ्यावर वारंवार बलात्कार केला असा गौप्यस्फोट अमेरिकेचा प्रसिद्ध पॉप सिंगर अॅरॉन कार्टरने केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

”माझी बहीण लेस्ली हिला दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा (बायपोलर) आजार होता. या मानसिक आजारावर मात करण्यासाठी तिला लिथियमचे औषध दिले जात होते. या औषधोपचारांचा तिला खूप राग येत होता. जेव्हा ती औषधं घ्यायची नाही तेव्हा ती अशा गोष्टी करायची ज्या तिच्याकडून कधीच अपेक्षित नव्हत्या,” असं अॅरॉनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

अॅरॉनची बहीण लेस्ली कार्टरचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे 2012 साली मृत्यू झाला. अॅरॉन दहा वर्षांचा असताना लेस्लीने त्याच्यावर बलात्कार केल्याचं त्याने ट्विटरवर सांगितलं. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत माझ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्याने पुढे सांगितलं. हे सर्व कृत्य लेस्लीने नशेच्या आहारी गेल्यामुळे केले असंही त्याने म्हटलं आहे.

अॅरॉन हा निक कार्टरचा लहान भाऊ आहे. हे दोघंही गायक आहेत. अॅरॉनने बहिणीबाबत हा धक्कादायक खुलासा केला असतानाच निकने अॅरॉनवर काही गंभीर आरोप केले आहेत. अॅरॉन हा माझ्या गर्भवती पत्नीला व मुलांना ठार मारण्याचा कट रचत आहे आणि त्याच्या भीतीने मी पोलीस संरक्षण मागितले आहे असं निकने म्हटलं आहे. तर अॅरॉनने निकचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

First Published on September 22, 2019 1:10 pm

Web Title: aaron carter claims on twitter that his late sister raped him as a child ssv 92