03 March 2021

News Flash

आयुष शर्मा घेणार टायगर श्रॉफच्या ट्रेनरकडून फिटनेस ट्रेनिंग

अपयशाने न खचता आता आयुषने जबरदस्त पुनरागमन करण्याची तयारी केली आहे.

आयुष शर्मा, टायगर श्रॉफ

बॉलिवूडमध्ये अनेकांसाठी ‘गॉडफादर’ ठरलेल्या अभिनेता सलमान खानने त्याच्या मेहुण्यालाही चित्रपटात लाँच केलं. मेहुणा आयुष शर्माने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्याची जबाबदारी ‘भाईजान’ अर्थात सलमानने आपल्या खांद्यावर घेतली होती. पण आयुषचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. तरीसुद्धा या अपयशाने न खचता आता आयुषने जबरदस्त पुनरागमन करण्याची तयारी केली आहे.

आयुषने त्याच्या आगामी चित्रपटासाठी अंदाजे १०-१२ किलो वजन वाढवले आहे. त्याच्या या नवीन लूकला लोकांची पसंती मिळत आहे. इतकंच नव्हे तर आता आयुष हा टायगर श्रॉफचा फिटनेस ट्रेनर विक्रम स्वैनकडून ट्रेनिंग घेणार असल्याचं कळतंय.

वाचा : बॉबी देओलच्या मुलावर नेटकरी फिदा

विक्रम आयुषला पुढील दोन चित्रपटांसाठी ट्रेन करणार आहे. सध्या तो आहारावर नियंत्रण ठेवत असून व्यापक प्रशिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयुष दिवसातील २-३ तास व्यायाम करत आहे. त्यासोबतच तो प्रथिन आणि कर्बोदकेयुक्त असा आहार घेत आहे. ट्रेनिंगमध्ये आयुष स्क्वाट्स, प्रेस, क्रॉल, पुल-अप्स आदी बॉडीवेट करताना दिसत आहे. आयुष कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट घेत नसून रेड मीट डाएट फॉलो करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 4:56 pm

Web Title: aayush sharma hires tiger shroffs fitness trainer
Next Stories
1 नऊ वर्षांनंतर मनोरंजन विश्वात परतणार डिनो मोरिया
2 बॉबी देओलच्या मुलावर नेटकरी फिदा
3 निर्भया बलात्कार प्रकरणावर नेटफ्लिक्सवर वेब सीरिज
Just Now!
X