18 November 2019

News Flash

‘बिग बीं’सोबत पहिल्यांदा काम करण्याविषयी आयुषमान सांगतोय..

'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार करणार असून चित्रपटात आयुषमान बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

आयुषमान खुराना, अमिताभ बच्चन

अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या अभ्यासपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’ अशा सुपरहिट चित्रपटांमुळे अभिनेता आयुषमानची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. सध्या त्याच्या ‘आर्टिकल 15’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता असून या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात आयुषमाने पोलिसाची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे.

‘आर्टिकल 15’ नंतर सुद्धा आयुषमानला अजिबात वेळ नाहीये. ‘ड्रीम गर्ल’, ‘गुलाबो सिताबो’, ‘बाला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो भूमिका साकारणार आहे. ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार करणार असून चित्रपटात आयुषमान बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आयुष्यात एकदा तरी अभिनयाचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमानला विचारण्यात आलं की, “अमितजींसोबत पहिल्यांदा काम करताना नेमकं कसं वाटतंय?”, त्यावर तो म्हणाला की, “खरंतर मला उत्सुकता आहे आणि त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करतोय याचं दडपणही आहे. त्यांच्यासोबत व स्क्रीन काम करताना मला नक्की काय वाटेल याचा मला काहीच अंदाज नाहीये. ‘विकी डोनर’ आणि ‘पिकू’ नंतर ड्रीम टीम एकत्र येतेय याचा मला खूप आनंद आहे.”

दरम्यान, ‘गुलाबो सिताबो’व्यतिरिक्त शूजित सरकार ‘उधम सिंह’ यांच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या आयुषमान सुद्धा ‘आर्टिकल १५’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 20, 2019 12:37 pm

Web Title: aayushman khurana article 15 amitabh bachchan djj 97
Just Now!
X