07 August 2020

News Flash

डीव्हिलियर्स दांपत्याकडे ‘गूड न्युज’; अनुष्का शर्माने दिल्या शुभेच्छा

डीव्हिलियर्स तिसऱ्यांदा होणार बाबा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स हा तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी डॅनियल डिव्हिलियर्स हिने गरोदर असल्याचा फोटो शेअर करत ही गोड बातमी साऱ्यांना दिली. डॅनियलने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला.

 

View this post on Instagram

 

Hello baby girl

A post shared by Danielle de Villiers (@danielledevilliers) on

कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे दोघे IPLमध्ये बंगळुरू संघाकडून अनेक वर्ष खेळत आहेत. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री आहे. या दोघांच्या पत्नीदेखील चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल या दोघांचे अभिनंदन केले. ‘अभिनंदन डॅनिएल आणि एबी! तुम्ही खूपच आनंदाची बातमी दिलीत’. अशी कमेंट अनुष्काने केली.

डीव्हिलियर्स आणि डॅनियल यांचा प्रेमविवाह आहे. पाच वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर २०१२ मध्ये डीव्हिलियर्सने गर्लफ्रेंड डॅनियल स्वार्ट हिला प्रपोज केलं. या दोघांनी मार्च २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतच भव्य दिव्य लग्नसोहळा केला.

२०१६ पर्यंत डीव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आपली पत्नी, दोन मुलं आणि कुटुंबीय यांना पुरेसा वेळ देण्यासाठी आपण निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितलं होतं. एबी डीव्हिलियर्स निवृत्त झाल्यापासून आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो आहे. करोनाचा सर्व जगाला फटका बसण्याआधी निवृत्तीच्या निर्णय रद्द करून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा डीव्हिलियर्सचा विचार होता. पण करोनामुळे सारं काही ठप्प झालं आणि त्यामुळे हा विचारही लांबणीवर पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 10:16 am

Web Title: ab de villiers and wife danielle to have third child anushka sharma reacts vjb 91
Next Stories
1 ‘बिग बॉस’फेम हिमांशी खुरानाने केली करोना चाचणी? जाणून घ्या सत्य
2 कतरिना कैफविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
3 हिंदुस्थानी भाऊची एकता कपूर विरोधात तक्रार; वेब सीरिजमधील सीनवर घेतला आक्षेप
Just Now!
X