रेमो डिसूजा यांच्या ‘एबीसीडी’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे लॉरेन गॉटलिब. या चित्रपटामध्ये तिने छोटेखानी भूमिका साकारली होती. लॉरेन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असून तिचा चाहतावर्गदेखील तितकाच आहे. अलिकडेच लॉरेनने तिच्या वैयक्तीक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला.

‘एबीसीडी २’नंतर लॉरेनसचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. इतकंच काय तर काही काळ ती कलाविश्वातून गायबच झाली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या काळामध्ये ती केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. काही दिवसांपूर्वी लॉरेनने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला. यावेळी बोलत असताना मी प्रचंड खचून गेले होते, असं तिने सांगितलं.

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
actor Gaurav S Bajaj welcomes baby girl
लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, आनंद व्यक्त करत म्हणाला, “चैत्र नवरात्रीत…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
aai kuthe kay karte fame akshaya gurav reveals her bad patch
“अचानक मालिकेतून काढलं अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली, “मी खचले…”

“एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटायचं की खूप खूश आहे. मात्र प्रत्यक्षात मी खूप खचून गेले होते. या नैराश्यापोटी मी व्यसनाच्या आहारी गेले होते. मी सतत ड्रग्स आणि दारुचं सेवन करत होते. जणू तो माझ्या जीवनाचा एक भागच झाला होता. या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केला”, असं लॉरेनने सांगितलं.

वाचा : Video: एकमेकांचे वैरी सिद्धार्थ-रश्मी अचानक ‘बिग बॉस’च्या घरात करु लागले रोमान्स

पुढे तिने सांगितलं, “त्यावेळी जर कोणी माझा साधा फोटो जरी काढला तरीदेखील माझी एखादी गोष्ट कोणीतरी हिसकावून घेत असल्याचं मला वाटायचं. अनेक वेळा मी फ्लाइटमध्ये तासनतास बसून रडत रहायचे आणि त्या काळात कोणी मला भेटलंच तर मी ठीक असल्याचा खोटं नाटक करायचे. व्यसनमुक्ती करण्यासाठी मी वेगवेगळ्या थेरपींचा वापर केला. त्यासाठी मी लॉस एंजलिसला गेले होते. तिथे ८ महिने मी सगळ्यापासून दूर राहिले. या काळात पुस्तकांचं वाचन केलं, ध्यानधारणा केली. त्यानंतर तब्बल २ वर्षांनंतर मी या व्यसनावर मात करु शकले”.दरम्यान, लॉरेन ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्शी’,  या चित्रपटाव्यतिरिक्त ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकली आहे.