News Flash

‘अभय २’मध्ये राम कपूर दिसणार अनोख्या अंदाजात, शेअर केला फर्स्ट लूक

पाहा राम कपूर यांचा अनोखा अंदाज

अभिनेते राम कपूर यांची सीरिज ‘अभय २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये ते एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सीरिजचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये सीरिजबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकताच राम कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अभय २’ या सीरिजचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये ते तुरुंगात असल्याचे दिसत आहेत. या सीरिज विषयी बोलताना ते म्हणाले, ‘प्रोमो ही एक झलक आहे. माझी भूमिका पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. मी साकारत असलेल्या भूमिकेला कोणतेही नाव नाही. एक वेगळा सायको किलर’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Coming soon…..

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

‘ही भूमिका साकारणे माझ्यासाठी थोडे कठिण होते. यापूर्वी मी अशी भूमिका साकारलेली नाही. तसेच मी या भूमिकेतून स्वत:ला पण घाबरवले आहे. माझ्या या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून तितकच प्रेम मिळू दे अशी आशा करतो’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

‘अभय २’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या सीरिजमध्ये राम कपूर यांच्यासोबत कुणाल खेमु देखील दिसणार आहे. ही सीरिज झी5 या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता राम कपूर यांचा अनोखा अंदाज पाहून चाहत्यांमध्ये सीरिज बाबतची उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 10:08 am

Web Title: abhay 2 managed to scare himself with villainous role ram kapoor avb 95
Next Stories
1 ‘जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या वेळी फक्त हृतिकला…’, अभय देओलने व्यक्त केला राग
2 भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे गेला सुशांतचा बळी, कंगनाचा नवा आरोप
3 ‘तुझ्यात जीव रंगला’मधील कलाकारांची करोना चाचणी; लवरकच शूटिंग होणार सुरु?
Just Now!
X