‘जिंदगी ना मिलेगी दोबार’, ‘चॉपस्टिक’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अभय देओल. अभिनयासोबतच मस्तीखोर आणि विनोदी स्वभावामुळे अभय विशेष ओळखला जातो. तो बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन देत असतो. नुकताच अभयने चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत असाच काहीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अभयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याचे म्हटले जात आहे. या फोटोमध्ये अभय एका खूर्चीमध्ये झोपला असून त्याच्या बाजूच्या खूर्चीमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर झोपले असल्याचे दिसत आहे. दोघांचा हा झोपलेला फोटो शेअर करत अभयने मजेशीर कॅप्शन दिले आहे. ते वाचून तुम्हालाही हसू येईल. ‘होय मी करुन दाखवले. मी माझ्या दिग्दर्शकासोबत झोपलो. महेश मांजरेकर यांच्यासोबत सेटवर’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

I finally did it. I slept with my director. On set with Mahesh Manjrekar. I’m a @hotstar.

A post shared by Abhay Deol (@abhaydeol) on

अभय देओल सध्या हॉटस्टारच्या एका वेब सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ही वेब सीरिज १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारित असून या वेब सीरिजचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. ही वेबसीरिज हॉटस्टारची सर्वात महागडी वेब सीरिज असल्याचे म्हटले जात आहे.