सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला जात आहे. अनेक स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. दरम्यान अभिनेता अभय देओल देखील या टीकाकारांमध्ये आता सामिल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो स्वत: फिल्मी बॅकग्राऊंडमधून आलेला असतानाही त्याने बॉलिवूडची पोल खोल केली. हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – करोना ‘मास्क’ला हिंदीमध्ये काय म्हणाल?; बिग बींनी दिलेलं उत्तर पाहून चक्रावून जाल

काय म्हणाला अभय?

तो म्हणाला, “सुशांतने चुकीचं पाऊल उचललं. अशी मक्तेदारी बॉलिवूडमध्ये आधीही होती आणि पुढेही राहणार. या मंडळींना फक्त प्रेक्षकच थांबवू शकतो. दूदैवाची बाब म्हणजे घराणेशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्याला सुशांतसारख्या गुणी कलाकाराच्या आत्महत्येची वाट पाहावी लागली. असो… अता तरी खरा प्रेक्षक जागृत झाला असेल अशी मला अपेक्षा आहे. खऱ्या, गुणवान, मेहनती कलाकारांनाच प्रेक्षकांनी प्रोत्साहन द्यावे, बाकीच्यांना मग तो कोणीही असेल कितीही मोठ्या स्टारचा मुलगा, मुलगी असेल त्यांना त्यांची जागी दाखवावी, अशी विनंती आहे. अन्यथा हे घराणेशाहीचं चक्र तुटणार नाही.”

अवश्य पाहा – “सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच”; कुमार सानू यांनी व्यक्त केला संताप

अभय देओल स्वत: सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील आहे. मात्र फिल्मी बॅकग्राऊंड असताना तो सध्या बॉलिवूडची पोल खोल करत आहे. त्याने आजवर ‘मनोरमा ६ फीट अंडर’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘देव डी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.