News Flash

आली समीप लग्नघटिका.. अभिज्ञा भावेच्या हातावर रंगली मेहंदी

मेहुल पै या उद्योजकाशी ती लग्नगाठ बांधणार आहे.

‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिज्ञाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून तिच्या हातावर मेहुलच्या नावाची मेहंदी लावण्यात आली आहे. मेहुल पै या उद्योजकाशी ती लग्नगाठ बांधणार आहे. मेहंदीच्या कार्यक्रमाला मराठी कलाविश्वातील अभिज्ञाच्या मित्रमैत्रिणींनीही हजेरी लावली. श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या कार्यक्रमाचे काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

मेहुल आणि अभिज्ञा यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झालं. गेल्या पंधरा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे. २०१४ मध्ये अभिज्ञाचं वरुण वैटिकरसोबत लग्न झालं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा मेहुल आणि अभिज्ञा संपर्कात आले. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि आता दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

पाहा फोटो >> अभिज्ञाची लगीनघाई! हातावर रंगली मेहुलच्या नावाची मेहंदी

ऑक्टोबर २०२० मध्ये मेहुल आणि अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला. या छोटेखानी समारंभाला फक्त कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती. येत्या सात जानेवारी रोजी हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 10:35 am

Web Title: abhidnya bhave pre wedding rituals begin enjoys mehendi ceremony with family and friends ssv 92
Next Stories
1 सासऱ्यांप्रमाणेच सूनबाईदेखील नृत्यात अव्वल; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘हा’ डान्स
2 जान्हवी कपूरने जुहूमध्ये घेतलं नवीन घर; किंमत ऐकून व्हाल थक्क!
3 ’खिसा’वर होतोय कौतुकाचा वर्षाव; मराठी कलाविश्वातील दिग्गज म्हणतात…
Just Now!
X