News Flash

शेतकरी महिलांनी बनवलेल्या घरगुती फराळाने अभिजीत खांडकेकरने साजरी केली दिवाळी

महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना आपण मदतीचा हात द्यायलाच हवा, असं अभिजीत म्हणाला.

अभिजीत खांडकेकर

अभिनेता अभिजीत खांडकेकर याने यंदा घरगुती दिवाळी फराळासाठी ‘किसानकनेक्ट’च्या ‘होमकिचन’वर मनापासून विश्वास ठेवला आहे. किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांशी गप्पा मारताना अभिजीतने सध्याची कठीण परिस्थिती आणि या परिस्थितीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाविषयी दुःख व्यक्त केलं.

महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना आपण मदतीचा हात द्यायलाच हवा, असं अभिजीत म्हणाला. “चकली, शंकरपाळे, चिवडा, करंजी, बेसनाचे लाडू इत्यादी पारंपरिक पदार्थांची लज्जत चाखता येते आणि या फराळामुळे मला माझ्या लहानपणीची आठवण येते. माझी आई आणि आजी असाच सुंदर, चविष्ट फराळ घरी तयार करायच्या,” अशा आठवणीही अभिजीतने सांगितल्या.

किसानकनेक्टच्या होमकिचन या उपक्रमाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकरी, ग्रामीण महिलांनी हा सगळा फराळ आपल्या हातांनी बनवला आहे. या दिवाळी फराळाला खरी पारंपरिक चव देण्यासाठी या महिला उत्तम दर्जाचे तेल आणि गायीचे शुद्ध तूप वापरतात. लॉकडाऊनच्या काळात किसानकनेक्टने ताज्या भाज्या आणि फळे पुरवल्याबद्दल अभिजीतने कृतज्ञता व्यक्त केली. किसानकनेक्ट अॅपच्या माध्यमातून ताजा शेतमाल थेट शेतातून ग्राहकांच्या दारात अगदी कॉण्टॅक्टलेस डिलिव्हरी पद्धतीने पोहोचवला जातो. अभिजीत नेहमीच या अॅपवरून फळ-भाज्यांची खरेदी करतो.

किसानकनेक्टच्या अॅपवरून ताज्या आणि स्वच्छ भाज्या व फळे मिळत असल्यामुळे मेघना एरंडे, राजेश कुमार आणि आसिफ शेख यांसारखे अनेक टीव्ही कलाकार या सेवेचा मनसोक्त लाभ घेतात. विशेषतः, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाना मदतीचा हात देताना या सगळ्यांनाच अभिमान वाटतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:14 pm

Web Title: abhijeet khandkekar celebrating diwali with farmer women made sweets ssv 92
Next Stories
1 Video : मुलीवरचा राग निवळला; शहनाज गिलच्या वडिलांची माघार
2 Video : लग्नासाठी सलमानने जुही चावलाच्या वडिलांकडे मागितला होता हात, पण..
3 ओटीटी माध्यमांवर अंकुश ठेवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी
Just Now!
X