बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी आपल्या चित्रविचित्र फोटोंमुळे तर कधी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत असते. परंतु यावेळी मात्र अनन्या अभिनेता अभिमन्यु दस्सानीमुळे चर्चेत आहे. अभिमन्युने तिच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र अनन्या सध्या रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे तो तिला डेटींगसाठी विचारु शकत नाही.
नेमकं काय म्हणाला अभिमन्यु?
अभिमन्युने कोईमोई डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अनन्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली. सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर या तीन पैकी कुठल्या अभिनेत्रीसोबत तुला डेटींवर जायला आवडेल असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यांपैकी त्याने अनन्याचे नाव घेतले. अनन्या त्याची खुप चांगली मैत्रिण आहे त्यामुळे तिच्यासोबत त्याला डेटींगवर जायला आवडेल असे तो म्हणाला. परंतु सध्या ती कुठल्याशा अभिनेत्याला डेट करत आहे. त्यामुळे तो तिला डेटींगसाठी विचारु शकत नाही असेही तो म्हणाला. मात्र या मुलाखतीमुळे अनन्याचा बॉयफ्रेंड कोण? ही चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे.
अभिमन्युने ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा सुपरहिट चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 12:53 pm