27 February 2021

News Flash

अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’मध्ये नव्या कलाकारची एण्ट्री, साकारणार खलनायकाची भूमिका

जाणून घ्या कोण आहे तो कलाकार..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा चित्रपटातील लूक समोर आला होता. अक्षयचा लूक पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटात आणखी एका कालाकाराची एण्ट्री झाली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे सांगितले आहे. ‘अभिमन्यू सिंग बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

अभिमन्यूने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील ‘गुलाल’, रक्षी चरित्र, मॉम, गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. आता अभिमन्यूला अक्षय कुमारसोबत पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अक्षयचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट २६ जानेवारी २०२२ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाने केली असून दिग्दर्शन फरहाद सामाजी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन आणि अभिनेता अर्शद वारसी देखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 10:23 am

Web Title: abhimanyu singh is going to play villan role in bachchan pandey avb 95
Next Stories
1 नाट्यरंग : हसता हसवता अंतर्मुख करणारे
2 लगीनघाई कलाकारांची
3 हेही नसे थोडके …
Just Now!
X