News Flash

“पैसे पचवतेस ही आणि म्हणते…” श्वेता तिवारीच्या आरोपांवर अभिनव म्हणाला…

"खोटं बोलणं थांबव श्वेता"

(Photo: Abhinav Kohli/Instagram)

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा भावी पती अभिनव कोहली यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोघांमधील आरोप प्रत्यारोपांतच्या फैरी सुरूच आहेत. श्वेता तिवारी मुलाला एकटं सोडून दक्षिण अफ्रेकेला गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. अभिनवने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत माझा मुलगा कुठे आहे? असा सवाल करत चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर श्वेतानेही अभिनववर काही आरोप केले.

अभिनवने केलेल्या आरोपावंर श्वेताने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत श्वेता म्हणाली, “मी केपटाऊनला रेयांश, त्याची आया आणि आईला सोबत आणलं असतं, पण अभिनवने यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा सहमती दिली नाही. मी रेयांनशच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.” असे आरोप श्वेताने केले.
श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत श्वेताने केलेला दावा खोटा असल्याचं म्हंटलं आहे.

अभिनवने श्वेतावर पुन्हा अनेक आरोप केले आहेत. तो म्हणाला, ” तू मुलाखतीत म्हणालीस की मी मुलांच्या संगोपनासाठी एक रुपया खर्च केला नाही. तुला जराही लाज वाटत नाही. जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो केला…त्य़ानंतरही शो केले… जवळपास ४० टक्के मी माझ्या अकाऊंमधऊन तुझ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले आहेत. पैसे पचवतेसही आणि म्हणते मी पैसे खर्च करत नाही. तू एकटीच पैसे खर्च करतेयस.” असं म्हणत अभिनवने श्वेताने केलेले आरोप फेटाळले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

वाचा : “माझ्याकडे नवरा आहे जो…”; ट्रोलरला ट्विंकल खन्नाचं हटके उत्तर

त्याचसोबत अभिनवने श्वेताचे इतर आरोपही बिनबुडाचे असल्याचं म्हंटलं आहे. “श्वेता खोटं बोलणं थांबव. तू जर मला इतके कॉल केले होतेस तर जरा क़ॉल रेकॉर्ड दाखवं. “असं म्हणत श्वेताने फोन केला नसल्याचं तो म्हणाला आहे. या व्हिडीओत अभिनव कायदेशीररित्या आता पावलं उचलणार असल्याचं म्हणाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

पुढे तो म्हणाला, ” इथे महामारी सुरू आहे. लोक कसे बसे जगत आहेत..आणि तू सगळं सोडून केपटाउनला गेलीस. तिसरी लाट तर लहान मुलांसाठी जास्त धोका दायक आहे. अशा वेळेत तू सर्व काही सोडून गेली कारण  तुला फक्त पैसै कमवायचे आहेत. पैशाची एवढी कमतरता भासली की तू महामारीत मुलाला सोडून गेलीस. ” असे आरोप त्याने केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 10:11 am

Web Title: abhinav kohale reacts to shweta tiwaris claims that he is not giving money for kids said stop lying kpw 89
Next Stories
1 “माझ्याकडे नवरा आहे जो…”; ट्रोलरला ट्विंकल खन्नाचं हटके उत्तर
2 “…तर त्यासाठी २०३५ साल उजाडेल”; सोनू सूदने व्यक्त केली खंत
3 Mother’s Day : “स्वत:चे पोट कसे भरायचे हे मला आईने शिकवले”, लता दीदींनी केला खुलासा
Just Now!
X