बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देताच ट्विट करत आनंद व्यक्त केला होते. पण या ट्विटमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान एका यूजरने अभिषेकला ड्रग्ज आहेत का असे विचारले. त्यावर अभिषेकने त्या यूजरला उत्तर देत चांगलेच सुनावले आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्जशी संबंधीत जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच अनेक कलाकार ड्रग्ज घेत असल्याचेही म्हटले जात आहे. अशातच अभिषेकच्या ट्विटवर एका यूजरने ‘हॅश (ड्रग्ज) है क्या?’ असे म्हटले होते. त्या यूजरला उत्तर देत अभिषेकने चांगलेच सुनावले आहे.

‘नाही. माफ कर. असे करु नकोस. पण मला तुझी मदत करताना आनंद होईल आणि मुंबई पोलिसांच्या समोर घेऊन जायला देखील. मला विश्वास आहे मुंबई पोलीस तुझी मागणी पाहून आनंदी होतील आणि तुझी मदत देखील करतील’ या आशयाचे उत्तर अभिषेकने त्या यूजरला देत सुनावले आहे.

काय होते अभिषेकचे ट्विट

अनॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु होणार हे ऐकल्यानंतर अभिषेकने आनंदी होऊन ट्विट केले. ‘आठवड्यातील सर्वात आनंदीची गोष्ट’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले हसून आनंदी झाल्याचा इमोजी वापरला होता. पण त्याला या ट्विटमुळे ट्रोल केले जात आहे.