बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊ येथे करत आहे. एका पार्कमध्ये चित्रीकरण सुरु असताना अचानक पोलिस तेथे आले आणि त्यांनी चित्रीकरण थांबवण्यास सांगितले. चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी घेण्यात आली होती मात्र पोलीसांनी चित्रीकरण थांबले.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, लखनऊ येथील बेगम हजरत महल पार्कमध्ये काल संध्याकाळी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. कोणीतरी पोलीसांना पार्कमध्ये चित्रीकरण सुरु असल्याची माहिती देताच पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले.

आणखी वाचा : म्हणून शर्मिला यांनी सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाला दिड महिन्यानंतरही पाहिलेले नाही

सेंट्रल झोनच्या डीसीपी सुमन वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी तेथे ५० ते ६० लोकं उपस्थित होते. त्यांच्याकडे चित्रीकरण करण्याची परवानगी होती. मात्र, पोलिसांनी ते बंद करण्याचे आदेश दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

काही दिवसांपूर्वी अभिषेकने सोशल मीडियावर लखनऊ येथील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याने मास्क लावले असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘कृपया मास्क लावा. जर तुम्हाला तुमच्यासाठी नसेल लावायचे तर कुटुंबीयांचा, मित्रांचा विचार करुन तरी लावा’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.