News Flash

मुलगी आराध्याच्या वाढदिवशी अभिषेकला मिळाले एक कोटींचे गिफ्ट!

आज आराध्या जरी ५ वर्षांची झाली असली तरी ५५ वर्षांच्या व्यक्तीसारखी वागते.

ट्विटर या सोशल मिडीया साइटवर अभिषेकच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्यावर पोहोचली.

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या हिचा बुधवारी पाचवा वाढदिवस झाला. त्याचदिवशी अभिषेकला एक कोटींचे गिफ्ट मिळाले. ट्विटर या सोशल मिडीया साइटवर अभिषेकच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्यावर पोहोचली.

अभिषेकने ट्विटरवरून त्याचा आनंद जाहीर केला. त्याने लिहले की, माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांनी मला गिफ्ट दिले. एक करोड (१० मिलियन) आमची संख्या वाढत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि सन्मान.

या दरम्यान, आराध्याचे आजोबा म्हणजेच बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरून नातीचा फोटो शेअर केले होते. त्यावर त्यांनी लिहलेल की, आज आराध्या जरी ५ वर्षांची झाली असली तरी ५५ वर्षांच्या व्यक्तीसारखी वागते. आज कालची मुले ही खूप हुशार, बुद्धीमान आहेत. त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचे पूर्ण ज्ञान त्यांना असते. यावेळी त्यांनी ऐश्वर्याचेही कौतुक केले. आराध्याला नक्की काय म्हणायचे आहे हे कधी कधी आम्हाला कळत नाही. पण ऐश्वर्या मात्र आराध्याच्या मनातले ओळखते. आई आणि मुलीचे नाते काही वेगळेच असतात. सध्या ऐश्वर्या तिच्या मुलीच्या बर्थडे पार्टीच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. २० नोव्हेंबरला ती आराध्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. याच दिवशी ऐश्वर्याचे बाबा कृष्णराज राय यांचा वाढदिवस असतो. २० तारखेला राय आणि बच्चन कुटुंबिय ही बर्थडे पार्टी त्यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर बी-टाऊनच्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरी करणार आहेत. आराध्याही तिच्या आजोबांसोबत वाढदिवस साजरा करायला उत्सुक आहे. सजावट कशी असावी याबद्दल तिनेही काही सुचना दिल्या आहेतच. यावेळी कृष्णराज राय यांच्या आवडीच्या पदार्थांचा समावेश जेवणात करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:10 pm

Web Title: abhishek bachchan has ten million followers on twitter
Next Stories
1 अजय मला वेळोवेळी सुंदरतेची जाणीव करुन देतो- काजोल
2 झोपडपट्टीतल्या जगण्याचा ‘आसरा’
3 मुव्ही रिव्ह्यू- फोर्स २ : अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन
Just Now!
X