26 November 2020

News Flash

‘जयपूर पिंक पँथर’वर येतेय वेब सीरिज; अभिषेकने शेअर केलेला ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

ले पंगा! जयपूर पिंक पँथरची निर्मिती कशी झाली?; पाहा या वेब सीरिजमध्ये...

‘प्रो कब्बडी लीग’मुळे कबड्डी या खेळात अमुलाग्र बदल झाला. २०१४ पासून सुरु झालेल्या या लीगमुळे आज कबड्डीदेखील क्रिकेट आणि फुटबॉलप्रमाणेच एक ग्लॅमरस खेळ म्हणून ओळखला जातो. ‘जयपूर पिंक पँथर’ ही टीम प्रो कब्बडी लीगची पहिली विजेता ठरली होती. या टीमचा विजयी प्रवास आता रुपेरी पडद्यावर दाखवला जाणार आहे. या टीमवर आधारित एक नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘द सन्स ऑफ सॉईल’ असं या सीरिजचं नाव आहे. ‘जयपूर पिंर पँथर’चा मालक अभिनेता अभिषेक बच्चन याने या आगामी सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

“आयुष्यात इतका उत्साही मी कधीही नव्हतो. या प्रवासानं माझं आयुष्य बदलून टाकलं. हा लक्षवेधी प्रवास तुम्ही देखील पाहावा अशी माझी इच्छा आहे.” अशा आशयाची कॉमेंट लिहून अभिषेकने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये जयपूर पिंक पँथरची निर्मिती कशी झाली? या टीमनं कसा सराव केला? अभिषेकनं त्यांना मोटिव्हेट कसं केलं? हे दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज येत्या चार डिसेंबरला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:03 pm

Web Title: abhishek bachchan jaipur pink panthers sons of the soil trailer mppg 94
Next Stories
1 अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यात जुंपली
2 हेलन- सलीम खान यांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’
3 ‘मुळशीचा पॅटर्न’चा दरारा पुन्हा एकदा; चित्रपटगृहांमध्ये घुमणार ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘चा आवाज
Just Now!
X