27 February 2021

News Flash

‘बॉब बिस्वास’साठी अभिषेकने वाढवलं १२ किलो वजन?

‘बॉब बिस्वास’मध्ये दिसणार अभिषेकचा नवा अंदाज

गेली कित्येक वर्ष चित्रपटांपासून दूर असलेला अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा प्रवाहात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक सातत्याने त्याच्या चित्रपट, वेब सीरिजमुळे चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी अभिषेक कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. अभिषेक लवकरच ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी तो प्रचंड मेहनत करत असून त्याने चक्क १२ किलो वजन वाढवल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिषेक लवकरच ‘बॉब बिस्वास’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो अथक प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेची गरज असल्यामुळे अभिषेकने त्याचं वजन १२ किलोने वाढवलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bob Biswas (@bobbiswasfilm)

वजन वाढल्यामुळे अभिषेकच्या लूकमध्ये पूर्णपणे बदल झाला असून त्याला ओळखणंदेखील कठीण होत आहे. ‘बॉब बिस्वास’च्या सेटवरील अभिषेकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर अभिषेकमध्ये झालेला बदल उघडपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा- “मी इन्स्टा’ग्रामीण’ माणूस”; निलेश साबळेचं सोशल मीडियावर पदार्पण

दरम्यान, वजन वाढवण्यासोबतच अभिषेकने बंगाली भाषेचेदेखील धडे गिरवले आहेत. अभिषेकचा हा आगामी चित्रपट बॉब बिस्वास यांच्या जीवनावर आधारित आहे. २०१२ मध्ये आलेल्या कहानी या विद्या बालनच्या चित्रपटात बॉब बिश्वास हे काल्पनिक पात्र तयार करण्यात आलं होतं. याच पात्रावर आधारित ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतं. कहानी या चित्रपटात बॉब बिस्वास नावाचा एक कॉन्ट्रॅक्ट किलर होता. ही भूमिका श्वाश्वत चटर्जीने साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 1:17 pm

Web Title: abhishek bachchan raised 12 kg weight upcoming film bob biswas ssj 93
Next Stories
1 ‘मी न्यूड फोटोशूट केलं आहे’, वनिताने सांगताच आई म्हणाली…
2 मान्यताच्या फोटोवर त्रिशालाने केली कमेंट, म्हणाली…
3 इरफानच्या आठवणीने शूजित सरकार भावूक
Just Now!
X