27 November 2020

News Flash

काम सुरु करण्यापूर्वी अभिषेक बच्चनने केला हेअरकट, हृतिकने केली कमेंट

अनुपम खेर, बिपाशा बासू अशा अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवासांमध्ये अभिषेकने करोनावर मात केली आणि तो घरी परतला. आता जवळपास २९ दिवसांच्या ब्रेकनंतर जुनिअर बच्चने मेकओव्हर केला आहे. अभिषेकने फोटो शेअर मेकओव्हर केल्याची माहिती दिली आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेता हृतिक रोशनसह अनेक कलाकारांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

नुकताच अभिषेकने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत पुन्हा कामावर रुजू होत असल्याची माहिती दिली. त्याने या पोस्टमध्ये त्याचा मेकओव्हरचा फोटो शेअर केला आहे. हा एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो असून त्यामध्ये अभिषेकचा हेअरकट करण्याआधीची फोटो आणि नंतरचा फोटो आहे.

 

View this post on Instagram

 

Before and after! Time to get back to work. Thank you @aalimhakim

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

‘पहिले आणि नंतर… पुन्हा कामावर रुजू होण्याची वेळ आली आहे’ या आशयाचे कॅप्शन अभिषेकने फोटो शेअर करताना दिले आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच अनेकजण या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने देखील अभिषेकच्या या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने ‘क्या बात है’ असे म्हटले आहे तर बिपाशा बासूने ‘चांगला दिसत आहेस AB’ असे म्हटले आहे. तसेच या फोटोवर अभिषेकची बहिण श्वेता बच्चन, अनुपम खेर यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:42 pm

Web Title: abhishek bachchan shares before and after photo of haircut hritik commented avb 95
Next Stories
1 “मी सत्याच्या बाजूने उभी”; रियाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीचं ट्रोलर्सला उत्तर
2 हिना खानला करायचं होतं ‘या’ क्षेत्रात करिअर; पण…
3 “घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी देव जबाबदार नाही”; शत्रूघ्न सिन्हा यांचा केंद्राला टोला
Just Now!
X