News Flash

PHOTO : ..या आहेत सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिका

सैफ अली खान आणि करिना कपूरची लग्नपत्रिका खऱ्या अर्थाने शाही होती.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

लग्न म्हटलं की मोठ्या उत्साहात सर्वजण या तयारीला लागतात. लग्नसमारंभाचा घाट घालण्याच्या या गडबडीत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लग्नपत्रिका. कलाकारांच्या खासगी आयुष्यासोबतच त्याच्या पत्रिकांबद्दलही प्रेक्षकांमध्ये बरंच कुतूहल पाहायला मिळतं. बऱ्याचदा अनेकांना या पत्रिका पाहण्याची संधीसुद्धा मिळत नाही. विविध थीम्स, कलाकुसर आणि काही हटके संकल्पना असलेल्या सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिकांवर आता आपण एक नजर टाकणार आहोत.

अभिनेता शाहिद कपूरचं अरेन्ज्ड मॅरेज अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारं ठरलं. मीरा राजपूतसोबत शाहिदने लग्नगाठ बांधत सुखी संसाराला सुरुवात केली. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत त्याचा आणि मीराचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये कोणत्याही गडद रंगाचा वापर करण्यात आला नव्हता. तरीही ती पत्रिका फार सुरेख दिसत होती.

shahid-meera

क्रिकेटर हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांचं लग्न म्हणजे बिग फॅट पंजाबी वेडिंग होतं. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांनी धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये लाल आणि सोनेरी रंगाचं सुरेख कॉम्बिनेशन पाहायला मिळालं होतं.

harbhajan

दियाच्या लग्नपत्रिकेसोबच पाहुण्यांसाठी खास मिठाईसुद्धा पाठवण्यात आली होती.

diya-m

विवेक ऑबेरॉयची लग्नपत्रिका फार पारंपारिक पद्धतीची असून अतिशय सुरेख पद्धतीने तिची सजावट करण्यात आली होती.

vivek-o

परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या भाच्याची म्हणजेच अभिनेता अमरान खानची लग्नपत्रिका फारच कलात्मक होती. अतिशय साधी पण, त्यातही सुरेख कलाकुसर असलेली अशी ही लग्नपत्रिका फार सुरेख होती.

imran

बी- टाऊनचं ‘मंकी कपल’ ओळखल्या जाणाऱ्या करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू यांच्या लग्नपत्रिकेवर सोनेरी रंगाची सुरेख नक्षी पाहायला मिळाली होती. या पत्रिकेवरही त्यांचं ‘मंकी लव्ह’ पाहायला मिळालं होतं.

bipasha

बॉलिवूडचा नवाब आणि बेगम म्हणजेच अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांची लग्नपत्रिका खऱ्या अर्थाने शाही होती असंच म्हणावं लागेल.

saif

नवाब कुटुंबातील आणखी एक चेहरा असणाऱ्या अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या लग्नपत्रिकेने अनेकांचच लक्ष वेधलं होतं.

soha

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

भाईजान सलमान खानची बहिण अर्पिताचा विवाहसोहळा दणक्यात पार पडला होता. तिच्या या ग्रॅण्ड विवाहसोहळ्याप्रमाणेच लग्नपत्रिकेतही ती भव्यता पाहायला मिळाली होती. अतिशय सुरेख पद्धतीने अर्पिताच्या लग्नाचं आमंत्रण पाठवण्यात आलं होतं.

arpita

बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठीत कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या मुलाच्या म्हणजेच अभिषेकच्या लग्नपत्रिकेत कौटुंबिक वारसाही पाहायला मिळाला. अतिशय पारंपारिक पद्धतीत असलेली ही पत्रिका अनेकांचीच दाद मिळवून गेली होती.

abhishek-b

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:50 pm

Web Title: abhishek bachchan soha ali khan bollywood celebrities wedding invitation cards images
Next Stories
1 ढोलकीच्या मंचावर आता स्टंटबाज, ठसकेबाज लावणीचा वेगळाच साज!
2 Afghan First Look: गाण्यानंतर आता अभिनयासाठी अदनान सामी सज्ज
3 ऐश्वर्याबद्दलची ‘ती’ वार्ता निव्वळ एक अफवा
Just Now!
X