हो हो अगदी बरोबर वाचलत अब्रामला आता छोटी बहिण मिळाली आहे. शाहरुखने सरोगसीद्वारे अजून एका बाळाला जन्म दिला की काय? असे तुमच्या मनात आले असेल ना…. पण, ही चिमुरडी बहिण मिळाली आहे ती शाहरुखच्या अब्राम खानला नाही तर वीणाच्या अब्रामला.
वीणा मलिकने गेल्याचवर्षी एका मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव अब्राम खान असे ठेवण्यात आल्याने सोशल मिडीयावरही चर्चा झाली होती. अब्रामनंतर आता तिने एका मुलीला जन्म दिला असून, तिचे नाव अमल असे ठेवले आहे. याबाबत तिने ट्विट करून सर्व चाहत्यांना माहिती दिली. चला, शाहरुखच्या अब्रामला नाही पण वीणाच्या अब्रामला तरी लहान बहिण मिळाली.
Welcome to our world my little princess #Amal Asad Khan….. We are blessed @Asadbashirr… Alhamadullilah … !!! pic.twitter.com/sPVLFR72Xy
— Veena Malik Khan (@iVeenaKhan) September 23, 2015
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 26, 2015 1:26 pm