27 February 2021

News Flash

Video : प्रसारमाध्यमांवर चिडला शाहरुखचा अबराम

आराध्याच्या बर्थ डे पार्टीमध्ये अबरामदेखील उपस्थित होता.

अबराम खान

बॉलिवूडचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याचं स्टारडम साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे सतत प्रसिद्धीझोतात राहणाऱ्या शाहरुखला प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांच्या गराड्यात राहण्याची सवय आहे. मात्र या स्टारडमची सवय त्याच्या लहानग्या अबरामाला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना पाहताच अबरामने फोटो काढण्यास मनाई केल्याचं पाहायला मिळालं.

१६ नोव्हेंबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या नातीचा म्हणजे आराध्याचा ७ वा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या मुलांनी या बर्थडे पार्टीमध्ये हजेरी लावली होती. त्यात शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा अबरामदेखील उपस्थित होता.

 

View this post on Instagram

 

Abram spotted leaving Aradhya party . . . #instabolly #bollywood

A post shared by Bollywood (@lnstabolly) on

आराध्याची बर्थ डे पार्टी संपल्यानंतर अबराम घरी जात असताना चाहत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी त्याच्या भोवती गराडा घालत फोटो काढण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या फोटोच्या भडीमारामुळे लहानगा अबराम गोंधळून गेला आणि त्याने ‘नो पिक्चर्स’ असं मोठ्याने ओरडत प्रसारमाध्यमांना फोटो काढण्यास मनाई केली. विशेष म्हणजे कॅमेरातून निघणाऱ्या फ्लॅशमुळे अबराम घाबरला आणि त्याने चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील चाहते आणि प्रसारमाध्यमे त्याचे फोटो घेत होते. त्यामुळे अबराम नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, स्टारकिड दिसल्यावर चाहते आणि प्रसारमाध्यमे त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात करतात. मात्र अनेक वेळा कॅमेराची आणि चाहत्यांच्या गराड्याची सवय नसल्यामुळे स्टारकिड गोंधळून गेल्याचं पाहायला मिळालं आहे. यापूर्वी सुहान खानसोबतदेखील असाच एक किस्सा घडला होता. सुहाना एका कार्यक्रमाला गेली असता अचानक तिच्या भोवती चाहत्यांनी गर्दी करत फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी सुहाना प्रचंड गोंधळून गेली होती. त्यानंतर शाहरुखने चाहत्यांना विनंती करत पुन्हा असं न करण्याचा सल्ला दिला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 9:57 am

Web Title: abram khan got irritated of clicking pictures by media
Next Stories
1 ‘या’ स्टारकिडचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण, सैफसोबत करणार स्क्रिन शेअर
2 ‘मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की’, ‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा
3 ‘आजोबा आमच्यासोबत का राहत नाही’, अबरामचा बिग बींना प्रश्न
Just Now!
X