23 September 2020

News Flash

डिजीटल विश्वात अनुष्का ठरली नंबर वन!

अनुष्काने श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांना मागे टाकलं आहे.

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा ‘सुई धागा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अनुष्काने बऱ्याच मुलाखती दिल्या. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही ती बरीच चर्चेत होती. म्हणूनच स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या डिजीटल न्यूज चार्टवर तिने इतर बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे.

अनुष्काच्या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर या यादीत पहिल्या स्थानावर होती. ‘स्त्री’ चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे श्रद्धा चर्चेत होती. मात्र अनुष्काच्या लोकप्रियतेने श्रद्धाला मागे टाकलं. ‘सुई धागा या चित्रपटामुळे अनुष्काच्या भूमिकेवर सोशल मीडियावर बरेच विनोदी मीम्स व्हायरल झाले. चित्रपटाचं प्रमोशन आणि इतर मुलाखतींसोबतच या मीम्समुळे अनुष्काची लोकप्रियता वाढली,’ असं स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सहसंस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितलं.
१०० गुण मिळवत अनुष्काने पहिलं स्थान पटकावलं तर ८५ गुणांसह श्रद्धा दुसऱ्या स्थानावर राहिली. ‘मनमर्जियां’ चित्रपटाची अभिनेत्री तापसी पन्नू ७७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दीपिका पदुकोण चौथ्या तर प्रियांका चोप्रा पाचव्या स्थानावर आहे. दोघींना अनुक्रमे ६२ व ५१ गुण आहेत. हे आकडे अमेरिकेची मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाकडून देण्यात आले आहेत.

सेलिब्रिटीची लोकप्रियता ज्या निकषांवर ठरवली जाते, त्याबद्दल अश्वनी कौल सांगतात की, ‘१४ भारतीय भाषांच्या ५०० हून अधिक न्यूज वेबसाइट्सवर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बाबतीत लिहिल्या जाणाऱ्या बातम्यांच्या आधारावर त्यांची लोकप्रियता ठरवली जाते. गेल्या काही दिवसांत अनुष्का शर्मा मुलाखती, व्हिडिओ, लेख आणि बातम्या यांमधून सतत झळकत होती.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 7:04 pm

Web Title: according to score trends india anushka sharma bags number one position in digital world
Next Stories
1 कमबॅक करण्यासाठी तनुश्रीने हा वाद उकरून काढला असावा, दिग्दर्शकाची टीका
2 संरक्षणमंत्री पर्रिकरांच्या भूमिकेत झळकणार हा मराठी अभिनेता
3 Koffee with Karan : आलियासोबत रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडची करण घेणार शाळा
Just Now!
X