01 March 2021

News Flash

चाहत्यांवर ‘शूटर दादी’ची छाप, लोकप्रियतेमध्ये पटकावलं पहिलं स्थान

भूमिने प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मालाही मागे टाकलं आहे

‘तन बुढ्ढा होता है, मन बुढ्ढा नहीं होता,’ अशी टॅगलाइन असलेला ‘सांड की आँख’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून या चित्रपटातील भूमिचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला आहे. त्यामुळेच लोकप्रियतेमध्ये भूमिने अन्य अभिनेत्रींवर मात करुन प्रथम स्थान पटकावलं आहे.

अमेरिकेच्या ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या अहवालानुसार, ‘सांड की आंख’ चित्रपटातल्या उत्तम अभिनयामुळे भूमि पेडणेकर लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये प्रथम स्थानावर आहे. तिने ५३ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ४७ गुणांसह तापसी पन्नू दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे या यादीमध्ये अनुष्का शर्मा तिस-या स्थानावर तर प्रियंका चोप्रा चौथ्या स्थानावर आहे.

दरम्यान, भूमिप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमध्ये अक्षय कुमारने प्रथम स्थान पटकावलं आहे. ‘मिशन मंगल’ आणि ‘हाउसफुल-४’नंतर त्याच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. ८८ गुणांसह तो प्रथम स्थानवर आहे. यामध्ये त्याने शाहरुखवरही मात केली आहे. शाहरुखला ६९ गुण मिळाल्यामुळे तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अमिताभ बच्चन, सलमान खान आहेत.

“हाऊसफुल-४ चा अक्षयचा लूक, ‘बाला’ गाणे आणि सिनेमाची प्रसिध्दी यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वायरल पब्लिकेशन्समध्ये अक्षय कुमारच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तर भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नूची फिल्म ‘सांड की आंखं’मधल्या त्यांच्या परफॉर्मन्ससाठी दोघींचेही खूप कौतुक झाले आणि म्हणूनच दोन्ही अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय,” असं स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्विनी कौल यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 3:36 pm

Web Title: according to score trends india bhumi pednekar bags number one position in digital world 1 ssj 93
Next Stories
1 आर. माधवनच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
2 सलमान खान मध्यरात्री शिल्पा शेट्टीच्या घरी जायचा, कारण…
3 माझे दुसरे लग्न म्हणजे ‘विष प्रयोग’
Just Now!
X