News Flash

तेजस्विनी, संजय, उमेश, सिद्धार्थच्या ‘ये रे ये रे पैसा’चे हटके पोस्टर फोटोशूट!

त्यांच्यासोबत काम करणे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातला फार उत्सुकतेचा आणि महत्त्वाचा क्षण असतो.

तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव

‘दंगल’, ‘जुडवा २’ चे पोस्टर मेकर अविनाश गोवारीकर यांनी केले ‘ये रे ये रे पैसा’चे पोस्टर फोटोशूट!

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव हे मराठीतले चार मोठे कलाकार पाहायला मिळत आहेत. ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ च्या पोस्टरसाठीच फोटोशूट खुद्द अविनाश गोवारीकर यांनी केल्याचं फोटोचं कॅप्शन पाहून स्पष्ट होतं.

वाचा : जेव्हा परदेशी पत्रकाराला ऐश्वर्याने दिलं ‘स्मार्ट’ उत्तर

‘दंगल’, ‘जुडवा २’, ‘मुबारकाँ’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ अशा एक ना अनेक बॉलिवूड चित्रपटांची पोस्टर्स गोवारीकर यांनी केली आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान असे मोठे कलाकार असोत किंवा वरूण धवन, आलिया भट्टसारखे सध्याचे तरुण कलाकार असोत, प्रत्येकालाच अविनाश यांनी आपल्या कॅमेरातून उत्तमरित्या टिपले आहे. त्यांच्यासोबत काम करणे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातला फार उत्सुकतेचा आणि महत्त्वाचा क्षण असतो.

आता याच नावाजलेल्या फोटोग्राफरने संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचे फोटोशूट केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरसाठी गोवारीकरांनी अनेक संकल्पना अमलात आणल्या. दिग्दर्शक संजय जाधवच्या अफलातून कल्पनेतून खूपच वेगळ्या प्रकारे हे फोटोशूट झाले आहे. अविनाश गोवारीकारांसोबत काम करण्याचा अनुभव चित्रपटाच्या कलाकारांसाठी नक्कीच खूप रंजक होता. गोवारीकरांनी पोस्ट केलेल्या फोटोतून हा उत्साह आपल्याला नक्कीच जाणवतो.

वाचा : वाढदिवशी प्रभासच चाहत्यांना देणार ‘सरप्राइज’

तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव अशी तगडी कलाकार मंडळी चित्रपटात आहेतच. परंतू, आता चित्रपटाचे पोस्टरही तगडे होईल यात काहीच शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 9:42 am

Web Title: ace photographer avinash gowarikar shoot for the poster of ye re ye re paisa
Next Stories
1 फ्लॅशबॅक : ‘ड्रीम गर्ल’चे दिग्दर्शन…
2 Happy Diwali 2017 : पहिला पाडवा विरहाचा
3 जेव्हा परदेशी पत्रकाराला ऐश्वर्याने दिलं ‘स्मार्ट’ उत्तर
Just Now!
X