News Flash

Video : बहुप्रतिक्षीत ‘आचार्य’चा टीझर प्रदर्शित; पाहा, चिरंजीवीचा दमदार लूक

पाहा, चिरंजीवीच्या आगामी 'आचार्य'चा टीझर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अभिनेता चिरंजीवीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तेलुगू, तामिळ आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केलेल्या चिरंजीवीचा आज एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच चिरंजीवीच्या आचार्य या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे हा टीझर कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चिरंजीवी दमदार भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात चिरंजीवी काही साहसदृश्य करताना दिसत आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात चिरंजीवीसोबत त्याचा मुलगा रामचरण आणि अभिनेत्री काजल अग्रवालदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

आणखी वाचा- प्रतिक्षा संपली! ‘केजीएफ चॅप्टर 2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरताल शिव करत असून निर्मिती रामचरण आणि निरंजन रेड्डी यांनी केली आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 3:33 pm

Web Title: acharya teaser megastar chiranjeevi paints a village red in his quest for justice ssj 93
Next Stories
1 एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ‘देसी गर्ल’ किती मानधन घेते माहित आहे का?
2 ‘हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे’; तांडव प्रकरणावर मुकेश खन्नांची आगपाखड
3 पोलंडमधील गर्भपाताच्या नव्या कायद्यावर बिग बींची नात म्हणते …
Just Now!
X