News Flash

रितेशवर कर्जाचे आरोप करणाऱ्यांनी मागितली माफी

चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा भाऊ अमित देशमुखला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सारसा येथील ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही कागदपत्र सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनी ट्विट करत शेअर केली होती. मात्र त्यांच्या ट्विटवर रितेशने उत्तर देत कर्ज घेतले नसल्याचा खुलासा केला.

सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे रितेशने कर्ज घेतल्याचे सांगितले होते. मात्र रितेशच्या ट्विटनंतर त्यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार आता मधू किश्वर यांनी रितेशची माफी मागितली आहे. ‘माझ्या मुंबईमधील एका मित्राने मला ही माहिती दिली. मी जाणूबुजून कधीच कोणाबाबत चुकीची माहिती शेअर करत नाही. मला माफ करा या प्रकरणात माझी दिशाभूल झाली. यापुढे मी माझ्या जवळच्या मित्रांवरही विश्वास ठेवणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करते. पण ज्या प्रकारे तुम्ही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी तुमचे कौतुक करते’ असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘ज्या प्रकारे रितेशने आमची चूक लक्षात आणून दिली खरच प्रभावी आहे. रितेश तुझे खूप खूप आभार तुझ्या एका ट्विटने मला अनेक महत्त्वाचे धडे मिळाले.’

रितेशने मधू किश्वर यांनी कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करताच ‘सोशल मीडियावर ही कागदपत्रे चुकीच्या उद्देशाने पसरवली जात आहेत. मी व अमितने कोणतेच कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे कोणत्याही कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका’ असे ट्विट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 11:16 am

Web Title: activist apologises to riteish deshmukh for misleading loan waiver accusation avb 95
Next Stories
1 लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचं हॉट फोटोशूट पाहिलंत का?
2 व्हायचं होतं डॉक्टर, पण झाला अभिनेता; कारण…
3 जावेद जाफरी : कॉमेडियन, डान्सर ते अष्टपैलू अभिनेता
Just Now!
X