अभिनेता अक्षत उत्कर्ष याचा मृत्यू झाला आहे. तो २६ वर्षांचा होता. मुंबईतील राहत्या घरी सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अवश्य पाहा – ‘म्हातारी’ म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार अक्षतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांना जबाबदार धरले आहे. त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची इच्छा नाही म्हणून त्यांनी अक्षतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून जाहिर केलं असा आरोप त्यांनी केला आहे. अर्थात पोलिसांनी या आरोपांवर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

अक्षत चित्रपटात काम करण्यासाठी बिहारमधून मुंबईत आला होता. तो आपल्या प्रेयसीसोबत मुंबईतील अंधेरी येथे राहात होता. त्याची प्रेयसी देखील एक अभिनेत्री आहे. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या माहितीनुसार अक्षतला चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम मिळत नव्हतं. ऑडिशनमध्ये मिळणाऱ्या नकारांमुळे तो त्रस्त होता. त्याची आर्थिक स्थिती देखील फारच वाईट झाली होती. त्याचे वडिल त्याला दर महिन्याला पैसे पाठवायचे. या पैशांवर तो आपला उदरनिर्वाह करत होता.