‘दिल दोस्ती दुनियादारी’ असो, ‘फास्टर फेणे’ असो किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ आपल्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ पाडणार अभिनेता म्हणजे अमेय वाघ. नाटक,मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांमध्ये झळकलेल्या अमेयने कलाविश्वात त्यांच स्वत: स्थान निर्माण केलं आहे. कलाविश्वात सक्रीय असलेला अमेय सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या काही सोशल पोस्टचीदेखील चर्चा होत असते. अलिकडे त्याने केलेल्या इन्स्टा पोस्टची चर्चा रंगली आहे. यात अमेयने फिरायला जाण्यासाठी टेकडीवरच का जातो हे सांगितलं आहे.

आपल्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेयने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एका टेकडीवर उभा असल्याचं दिसून येत आहे. मात्र या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.


“बरीच पोरं टेकडीवर “हिरवळ” बघायला जातात! पण खरं सांगतो मी झाडं, फुलं आणि पानं बघायला जातो!” , असं कॅप्शन अमेयने या फोटोला दिलं आहे. त्याचा हा फोटो त्याच्या पत्नीने म्हणजेच साजिरीने कॅमेरात कैद केला आहे.

दरम्यान, अमेय वाघ हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अलिकडेच गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी त्याला झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अमेय लवकरच ‘झोंबिवली’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असल्याचं म्हटलं जात आहे.