मराठी कलाकार म्हणजे ‘गरीब बिच्चारा’, ‘टॅक्सी किंवा भाडय़ाची गाडी करुन येणारा’, कमी मानधन मिळणारा, ग्लॅमर नसलेला ही प्रतिमा गेल्या काही वर्षांपासून बदलायला सुरुवात झाली आहे. मराठी कलाकारांकडेही आता एक पाऊल पुढे जात आलिशान आणि महागडय़ा गाडय़ा आल्या आहेत. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेने प्रसिद्धीस आलेल्या अमेयनेही त्याच्या स्वप्नातली गाडी विकत घेतली आहे.
नुकताचं अमेयने आपल्या नव्या गाडीसोबतचे एक छायाचित्र सोशल मिडियावर प्रसिद्ध केला होता. या छायाचित्रासह त्याने म्हटले की , एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या आयुष्यात आलेला आनंद म्हणजे त्याची पहिली गाडी #fordecosport. अमेयने फोर्ड इको स्पोर्ट ही गाडी विकत घेतली आहे.
12985599_10208128778490222_8168946857721688433_n
अमेयच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो यासाठी त्याला खूप सा-या शुभेच्छा.