News Flash

“मला स्वत: श्वास घ्यायचाय”; २२ दिवसांपासून करोनाशी लढणाऱ्या अभिनेत्याची भावूक पोस्ट

अनिरुद्ध दवे २२ दिवसांपासून ऑक्सीजन सपोर्टवर

छोट्या पडद्यावरील ‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारा अभिनेता अनिरुद्ध दवेची २३ एप्रिलला करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल झाला. मात्र आठवड्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. गेल्या २२ दिवसांपासून अनिरुद्ध करोनाची लढाई लढतोय. त्याच्या फुफ्फुसांमध्ये ८५ टक्के इन्फेक्शन पसरलंय.तसचं ऑक्सीजनची पातळी देखील खालावली आहे. अनिरुद्धचे चाहते त्याच्या आणि कुटुंबिय त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान अनिरुद्धने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत प्रकृतीची माहिती देखील दिलीय. काही महिन्यांपूर्वीच अनिरुद्धच्या पत्नीने एका चिमुकल्या मुलला जन्म दिलाय. आपल्या मुलासोबतचा एक क्यूट फोटो शेअर करत अनिरुद्ध म्हणाला, “आभार, हा खर तर खूप छोटा शब्द आहे. गेल्या २२ दिवसांपासून रुग्णालयातील बेडवर तुम्हा सर्वांच प्रेम, आशिर्वाद, प्रार्थना आणि आपुलकी मला जाणवतेय. पूर्णवेळ ऑक्सीजनवर आहे. मात्र तुमच्यामुळे हिम्मीत वाढली. अरे पण तुम्ही मोठी उधारी केली यार. १४ दिवसांनंतर आयसीयूच्या बाहेर आता थोडं बरं वाटतंय. फुफ्फुसांमध्ये ८५ टक्के इन्फेक्शन आहे. थोडा वेळ लागेल, घाई नाही. फक्त आता स्वत: श्वास घ्यायचा आहे मला. लवकरच भेटू. भावूक झालो तर माझं सॅच्युरेश कमी होतं. मी मॉनिटरमध्ये पहिलं. ” असं अनिरुद्ध म्हणालाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by ANIRUDH V DAVE (@aniruddh_dave)

शेवटी त्याच्या पोस्टमध्ये अनिरुद्धने लवकरच सर्व ठिक होईल असं म्हणत त्याच्यातील सकारात्मकता दाखवून दिलीय. ही वेळ देखील जाईल असं तो म्हणालाय.

अनिरुद्ध भोपाळमध्ये एका वेब सीरिजचं शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यानच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर भोपाळमधील एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्धची पत्नी शुभीने एक पोस्ट शेअर करत बाळ आणि पतीला झालेली करोनाची लागण यात सर्व सांभाळणं कठीण जात असल्याचं सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 7:35 pm

Web Title: actor anirudh dave share emotional post on instagram said i want to breath my self kpw 89
Next Stories
1 ‘द फॅमिली मॅन २’च्या ट्रेलरमध्ये आसिफ बसरा यांना पाहून चाहते झाले भावूक
2 “मला पश्चाताप नाही, मी फक्त…”; ‘त्या’ व्हिडीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका सिंह म्हणाली…
3 प्रियांकाने बॉयफ्रेंडल कपाटात लपवलं, मावशीने आईला फोन केला अन्..
Just Now!
X