News Flash

“आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे..”; अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

लसीच्या तुडवड्यावरून साधला निशाणा

मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी सोशल मीडियावर सक्रिय होऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच अंकुशने त्याच्या हटके अंदाजात चाहत्यांना मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता अंकुशने आणखी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अंकुश चौधरीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मेजीशीर पोस्ट शेअर केलीय. करोनामुळे सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमध्ये हलका-फुलका विनोद करत अंकुशने नेटकऱ्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय. या पोस्टमध्ये तो म्हणालाय, “आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे….ती सध्या कुठे मिळते” अंकुशच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

सध्या देशात लसींच्या तुटवड्यावरून वातावरण तापलंय. अनेक क्रेंदावर पुरेशी लस उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या रांगा पाहायला मिळता. तर अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लसीचा दुसरा डोस मात्र त्यांना उपलब्ध झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर अंकुशने केलेली पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.

अंकुशच्या या पोस्टवर अभिनेता सुयश टिळक आणि संग्राम साळवीने इमोजी देत प्रितिक्रिया दिलीय. याआधी देखील अंकुशने एक हटके पोस्ट शेअर केली होती. यात दुनियादारी सिनेमाच्या डॉयलॉगचा वापर केला होता. ” तेरी मेरी यारी , अगोदर मास्क घालू, मग करू दुनियादारी.” असं म्हणत त्याने चाहत्यांना मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

“दिग्या बोलला म्हणजे बोलला” अशी कमेंट स्वप्नील जोशीने अंकुश चौधरीच्या या पोस्टला दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:11 pm

Web Title: actor ankush chudhari share funny post on vaccination said where she is now kpw 89
Next Stories
1 The Family Man 2: प्रतिक्षा संपली, या दिवशी रिलीज होणार मनोज वायपेयीच्या सिरीजचा ट्रेलर!
2 “तू तर आमिर खानचा मुलगा आहेस ना?”; नेटकऱ्याच्या प्रश्नावर आयराचं सडेतोड उत्तर
3 साखरपुडा मोडून १७ वर्ष झाली, तरी ‘ही’ अभिनेत्री घालते तिच अंगठी
Just Now!
X