News Flash

इस्कॉनच्या वर्धापन सोहळ्यात ग्रेसी सिंगचा अलौकिक नृत्याविष्कार

ग्रेसीने इस्कॉनच्या ४० व्या वर्धापन सोहळ्याला हजेरी लावली होती.

इस्कॉनच्या वर्धापन सोहळ्यात ग्रेसी सिंगचा अलौकिक नृत्याविष्कार
ग्रेसी सिंग

लगान चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ग्रेस सिंग केल्या काही काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ग्रेसीचा समाजकार्यामध्ये सहभाग असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतं. ग्रेसीने नुकतीच इस्कॉनच्या ४० व्या वर्धापन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी ग्रेसीने केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित साऱ्यांना अचंबित केल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईमधील जुहू येथे इस्कॉनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रेसी आणि तिच्या संपूर्ण टीमने नृत्याविष्कार सादर केलं. या कार्यक्रमाचं आयोजन कवी नारायण अग्रवाल यांनी केलं होतं. यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी, डॉ. राजन शंकरन, द अदर सॉंगच्या डॉ. मेघना शाह, डॉ.सोमा घोष, सुभंकर घोष, विवेक प्रकाश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, ‘आज हा इथे साकारलेला नृत्याविष्काराचा शो माझ्यासाठी कठीण होता. मी साधारणता: एक तासाचा शो करते. मात्र येथे तब्बल दोन तासांचा हा कार्यक्रम होता. त्यामुळे मला टेंशन आलं होतं. त्यातच भर पडली ती या वेगवेगळ्या नृत्यशैलींची. माझ्या नृत्यात भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि बॅलेट या शैलीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे माझ्यासाठी हे खूपच आव्हानात्मक होते, असं ग्रेसी म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 1:40 pm

Web Title: actor danseuse gracy singh performed along with her troupe at iskcon
Next Stories
1 stree box office collection day 1 : जाणून घ्या, ‘स्त्री’ची पहिल्या दिवसाची कमाई
2 पुन्हा एकदा एकत्र येणार अंकिता -सुशांत ?
3 Video : ‘बॉईज २’ चा टीझर पाहिलात का ?
Just Now!
X