News Flash

‘कोलावरी’ धनुषचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण..

नुकतेच या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले.

'पॉवर पांडी' या चित्रपटाचे पोस्टर धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील नावाजलेला अभिनेता धनुष आगामी ‘पॉवर पांडी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असणार आहेत सुपरस्टार रजनीकांत. ‘कबाली’ चित्रपटानंतर आता रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटातील भूमिकेबद्दल चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले.
अभिनय, निर्मिती आणि गायन क्षेत्रात आपली छाप पाडल्यानल्यानंतर आता धनुष दिग्दर्शनाकडे वळला आहे. नेहमीच मोठ्या आणि मुख्य भूमिकांमध्ये दिसणारे ‘थलाईवा’ म्हणजेच रजनीकांत या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारणार आहेत. रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसन्ना आणि छाया सिंग हे सुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘पॉवर पांडी’ या चित्रपटाचे पोस्टर धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकार मोटरसायकलस्वारांच्या रुपात दिसत आहेत. या चित्रपटाती इतर कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यातच ठेवलेली आहेत. असे असले, तरीही चित्रपटाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
अभिनेता धनुष सध्या ‘वाडा चेन्नई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासोबतच त्याचे ‘थोडारी’ आणि ‘कोडी’ हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान अभिनेता रजनीकांत धनुषच्या या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहेत. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ या चित्रपटाने सर्वच चित्रपटांचे विक्रम मोडित काढले होते. या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासह अभिनेत्री राधिका आपटेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 11:53 am

Web Title: actor dhanush will now direct the film power pandi
Next Stories
1 ‘आशिकी ३’साठी सिद्धार्थ-आलिया
2 सलमानच्या तोंडून ऐश्वर्याची तारीफ
3 आशाताईंच्या काश्मिरी गीतांना ‘सुवर्ण’ झळाळी
Just Now!
X