प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. दिलीप मदुराई येथे आपल्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत होता. दिलीपला हे संपूर्ण प्रकरण रचण्याबद्दल अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दिलीप आणि सिनेदिग्दर्शक नादिर शहा यांची जवळपास १३ तास चौकशी करण्यात आली होती.

एक माणूस माझ्या आयुष्यात आला आणि अर्ध्यावर निघून गेला.. बास एवढंच झालं- जेनिफर विंगेट

त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी दिलीपची पत्नी काव्या माधवन हिच्या ऑफिसच्या ठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी दिलीपला ताब्यात घेण्यात आले आणि संध्याकाळी त्याला अटक केली असे दाखवण्यात आले. पोलिसांच्या मते, संपूर्ण घटनेची तयारी वर्षभरापूर्वी करण्यात आली होती आणि हे दुसऱ्यांदा घडत होते जेव्हा १९ फेब्रुवारीला कोचीच्या जवळ रात्री अभिनेत्रीवर हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी एप्रिलमध्ये सुपारी गँगच्या विरोधात अभिनेत्रीवर हल्ला केल्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. गेल्या महिन्यात या गँगमधील सुनील कुमार उर्फ पल्सर सुनी याने लिहिलेले एक पत्र समोर आले. या पत्रात सुनीने दिलीपकडे पैशांची मदत मागितली होती. दरम्यान, दिलीपने पोलिसांकडे सुनील त्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार नोंदवली होती.

बेंबीवर नारळ फेकणाऱ्या दिग्दर्शकावर तापसीने साधला निशाणा, व्हिडिओ व्हायरल

या घटनेच्या तपासात दिलीपने या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मल्याळम मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेता दिलीपचे समर्थन केले आहे.