चित्रपटात काम मिळवणून देण्याच्या नावाखाली आज काल लोकांची फसवणुक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पण आता एक कंपनी सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या नावाने फसवणूक करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कंपनीचे नाव SKF असे असून ही कंपनी लोकांना खोटे मेल पाठवून सलमानच्या आगामी चित्रपटात काम देण्याची खोटी ऑफर देत असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अंश अरोराने उघडकीस आणला आहे. तसेच त्याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अंशला सलमान खानच्या चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर मिळाली होती. त्यासाठी त्याला काही फोन, मसेज आणि इमेल देखील आले होते. हे इमेल “shruti@salmankhanfilm.com” या आयडीवरुन पाठवण्यात आले होते.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

अंशला ‘टायगर जिंदा है ३’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. ३ मार्च रोजी या भूमिकेसाठी अंशचे ऑडिशन घेण्यात येणार होते. तसेच चित्रपट निर्माते प्रभूदेवा यांच्यासोबत त्याच दिवशी ११ वाजता मिटींग असल्याचे देखील सांगण्यात आले होते. पण नंतर काही कारणास्तव ही मिटींग रद्द करण्यात आल्याचे अंशने सांगितले.

प्रभूदेवा कामात व्यग्र असल्यामुळे ही मिटींग रद्द करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. पण निर्मात्यांना अंशची प्रोफ्राइल प्रचंड आवडली असल्याचे सांगण्यात आले होते. त्या फोन कॉल आणि इमेलमध्ये अंशाला भेटण्यासाठी कंपनीमध्ये बोलवण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्यासोबत एक शर्टलेस फोटो आणण्यासही सांगण्यात आले होते

काही दिवसांपूर्वी सलमानने “मी किंवा माझी कंपनी सध्या कुठल्याही नव्या चित्रपटासाठी कास्टिंग करत नाही. आम्ही कुठल्याही एजंटकडे कलाकार शोधण्याची जबाबदारी सोपवलेली नाही. या संबंधी जर तुम्हाला कुठल्याही इमेल किंवा मेसेज आले तर त्यावर विश्वास ठेवू नका. अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सलमान खान फिल्म कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे” अशा आशयाचे ट्विट केले होते.

सलमानच्या या ट्विटनंतर हे सर्व खोट असल्याचे अंशला कळाले. त्याने तातडीने ओशिवारा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.