News Flash

गोविंदा नाच विसरला !

गोविंदाला अभिनेता करण जोहर याच्या जागी एक दिवसासाठी सेलिब्रिटी परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते.

गोविंदा हिरो म्हणून लोकप्रिय होता तेव्हाही कामाच्या बाबतीत तो आळशी, गर्विष्ठ, सेटवर उशिरा येणारा म्हणूनच परिचित होता. आता त्याच्याही आधीच्या पिढीतील अनेक लहानमोठे कलाकार अगदी अनिल कपूरपासून चंकी पांडेपर्यंत अनेकविध चित्रपटांतून दिसतात. पण गोविंदाच्या वाटय़ाला फारशा भूमिका येत नाहीत. या वर्षी ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये एका दिवसासाठी परीक्षक म्हणून त्याला बोलावण्यात आले होते. सेटवर गोविंदाला नाचायला सांगितले नसते तरच आश्चर्य वाटले असते, पण खरी आश्चर्याची गोष्ट पुढेच होती. गोविंदाने चक्क आपण आपला नाच विसरलो आहोत, असे सांगून टाकले.
गेली कित्येक वर्षे गोविंदा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. गेल्या वर्षी यशराज प्रॉडक्शनच्या ‘किल दिल’मध्ये त्याने भूमिका केली होती. पण चित्रपट सपशेल आपटला. त्यामुळे गोविंदाचे पुनरागमनही त्यातच वाहून गेले. त्यानंतर मात्र त्याने आपल्याला सूट होतील अशाच भूमिका करण्याचे कारण पुढे करत कामच केले नव्हते. आता वर्षभरानंतर ‘झलक दिखला जा’च्या सेटवर परीक्षक म्हणून त्याला बोलावण्यात आले. ‘झलक..’ हा नृत्यावरचा रिअ‍ॅलिटी शो आहे. आणि गोविंदा हा आपल्या हटके स्टाईल नाचासाठी आजही प्रसिद्ध आहे. त्याच्या चित्रपटातील गाणी आणि त्यावरचे त्याचे नृत्य याची भुरळ आजही रणवीर सिंगसारख्या नवीन कलाकारांना पडते. त्यामुळे ‘झलक..’च्या सेटवर त्याला नृत्यासाठीच परीक्षक म्हणून बोलावले गेले हे साहजिक आहे.
गोविंदाला अभिनेता करण जोहर याच्या जागी एक दिवसासाठी सेलिब्रिटी परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. करण जोहर सध्या ‘ड्रीम टुर’बरोबर अमेरिकेत असल्याने त्याच्या जागी एकेक सेलिब्रिटी परीक्षकाची भूमिका पार पडतो आहे. गोविंदाला स्पर्धकांनी त्याच्या शैलीत नृत्य करण्यासाठी गळ घातली. त्यावर मी माझा नाच विसरलो आहे, असे उत्तर त्याने दिले.
तरीही स्पर्धकांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी गोविंदाला त्याच्याच गाण्यांची आणि नृत्याची आठवण करून दिली. तेव्हा कुठे गोविंदाने आपले लटके-झटके दाखवत काही नाच करून दाखवला. मात्र त्यात आधीच्या गोविंदाची मजा नव्हती.
तो खरंच त्याचा नाच विसरला आहे आणि ते त्याच्या सादरीकरणावरून दिसून येत होते, असे सेटवरच्या सूत्रांनी सांगितले. फिटनेस, अभिनय सगळ्याच बाबतीत मागे पडलेला गोविंदा आपल्या आळशीपणापायी एकेकाळी त्याचे वैशिष्टय़ म्हणून ओळखली गेलेली नाचाची स्टाईलही घालवून बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 12:46 am

Web Title: actor govinda forgotten dance
Next Stories
1 मनोरंजन.. : स्वीत्र्झलडमध्ये यश चोप्रा यांचा पुतळा
2 ‘ठग’ सिनेमासाठी हा अभिनेता आकारतोय तब्बल ६० कोटी?
3 आलिया- कतरिनाचे अनोखे अॅरोबिक्स
Just Now!
X