21 October 2019

News Flash

‘नो पार्किंग’मध्ये बाइक पार्क केल्याचा इशानला फटका, भरावा लागला दंड

मुंबईतल्या वांद्रे इथली ही घटना आहे.

इशान खट्टर

‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला शाहिद कपूरचा भाऊ आणि अभिनेता इशान खट्टर सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. इशान त्याच्या चित्रपटामुळे नाही तर पार्किंगचे नियम मोडल्याने चर्चेत आला आहे. इशानने ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईतल्या वांद्रे इथली ही घटना आहे.

इशानने त्याची बाइक नो पार्किंग झोनमध्ये लावली होती. बाइक पार्क करून तो वांद्रे इथल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. रेस्टॉरंटबाहेर पडताच त्याने पाहिले की, पोलीस त्याच्या बाइकला टो करत आहेत. हे पाहताचक्षणी तो धावत पोलिसांकडे गेला आणि त्यांना विनंती करू लागला. अखेर इशानकडून दंड वसून करून पोलिसांनी त्याची बाइक त्याच्या स्वाधीन केली. नो पार्किंग झोनमध्ये बाइक पार्क केल्याबद्दल इशानला ५०० रुपयांचा दंड भरावा लागला.

वाचा : ..म्हणून भारतात राहूनही आलिया भट्ट नाही करू शकणार मतदान

वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्याने नुकतंच अभिनेत्री सारा अली खानलाही दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली होती. विना हेल्मेट बाइक राइड केल्याचा साराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली होती.

First Published on April 15, 2019 5:32 pm

Web Title: actor ishaan khatter fined rs 500 for parking his sports bike in no parking