हिंदी चित्रपटसृष्टीत आई-वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांची अनेक उदाहरणे आहेत. आजवर अनेक सेलिब्रिटी मुलांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. लवकरच सारा अली खान, जान्हवी कपूर, इशान खत्तर हे सेलिब्रिटी किड्सही आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसतील. हाच ट्रेण्ड हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळतो आहे. श्रिया पिळगावकर, सखी गोखले, अभिनय बेर्डे, स्वानंदी टिकेकर या मराठी कलाकारांच्या मुलांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या यादीत काही महिन्यांपूर्वीच स्वामिनी वाडकर हिचे नाव समाविष्ट झाले.

PHOTO : झहीर- सागरिकाच्या लग्नाचा पहिला फोटो

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयवंत वाडकर यांची स्वामिनी ही कन्या आहे. आकाश ठोसरच्या ‘एफयू’ चित्रपटाने तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वडिलांप्रमाणेच स्वामिनीसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. या फोटोंमध्ये स्वामिनीचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळतो.

PHOTO : प्रार्थनाचा ‘ड्रीम टॅटू’

स्वामिनी १७ वर्षांची आहे. तिला अभिनयासोबतच नृत्याचीसुद्धा आवड आहे. स्वामिनी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. जयवंत आणि लक्ष्मीकांत यांची जेवढी घट्ट मैत्री होती तेवढीच घट्ट मैत्री स्वामिनी आणि स्वानंदीमध्येही आहे.

https://www.instagram.com/p/BIgv02ahZ-t/

https://www.instagram.com/p/BIfbghZBwmp/

https://www.instagram.com/p/BQYjOe8hVmd/

https://www.instagram.com/p/BRLReTfBjkA/

https://www.instagram.com/p/BU7cNZnhmrv/

https://www.instagram.com/p/BbGZF_2Dn9S/

https://www.instagram.com/p/BaLFxncjTcV/