News Flash

व्हायचं होतं डॉक्टर, पण झाला अभिनेता; कारण…

...आणि त्याची पावलं कलाविश्वाकडे वळाली

व्हायचं होतं डॉक्टर, पण झाला अभिनेता; कारण…
जिमी शेरगील

बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम करुनदेखील ज्याने लोकप्रियता मिळविली असा अभिनेता म्हणजे जिमी शेरगील. जिमीने अनेक चित्रपटांमध्ये साइड रोल केले. मात्र त्यातही त्याने त्याच्या अभिनयाची विविधता जोपासली. ‘माचिस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जिमीने खरंतर अभिनेता होण्यापेक्षा डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र काही कारणास्तव त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही आणि त्याची पावलं कलाविश्वाकडे वळाली.

गुलजार दिग्दर्शित ‘माचिस’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जिमीने लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. खरं तर त्याने डॉक्टर व्हावं ही त्याच्या आईची इच्छा होती. तिचं हेच स्वप्न त्यानेही पाहिलं. इतकंच नाही तर तिने त्यासाठी प्रयत्नदेखील केले. मात्र त्याला डॉक्टर होणं काही जमलं नाही. एका मुलाखतीमध्ये त्याने डॉक्टर का होता आलं नाही, यामागचं कारणंही सांगितलं. मला डॉक्टर होण्याची इच्छा होती, मात्र वैद्यकीय शिक्षण घेतांना प्रॅक्टीकलच्यावेळी जे बेडूक किंवा झुरळ कापावे लागतात. ते करणं मला जमलं नसतं. मुळात या प्राण्यांना असं मारणं किंवा कापण्याची माझी हिंमतच होत नव्हती. त्यांमुळे मी डॉक्टर होता होता राहिलो.

 

View this post on Instagram

 

Say HELLO to my new friend ..#newlook #sat Sri AKal

A post shared by Jimmy Shergill (@jimmysheirgillofficial) on


दरम्यान, जिमीने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मोहब्बतें चित्रपटातील त्याच्या भूमिकेची आणि लूकची विशेष चर्चा रंगली होती. आतापर्यंत त्याने ‘मेरे यार की शादी’, ‘वॉट ए लूजर’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्ना भाई MBBS’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 9:57 am

Web Title: actor jimmy shergill wanted to be doctor but actor ssj 93
Next Stories
1 जावेद जाफरी : कॉमेडियन, डान्सर ते अष्टपैलू अभिनेता
2 नाटय़कर्मी घडवणाऱ्या महाविद्यालयीन नाटय़संस्था
3 प्रसंग आला पण..
Just Now!
X