News Flash

पतीसोबत कायदेशीर लढाई दरम्यान अभिनेत्री निशा रावलने दिला एक मेसेज

पती अभिनेता करण मेहरासोबत कायदेशीर लढाई दरम्यान अभिनेत्र निशा रावलने संदेश देत एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायर झाला आहे.

Karan-Mehra-Nisha-Rawal
(Photo-Loksatta File image)

अभिनेत्री निशा रावल सध्या तिच्या आणि पती करण मेहरामध्ये सुरू असलेल्या वादामुळे चांगलीच चर्चेत आहे. यांच्या वैवाहिक जीवनात एक कठीण प्रसंग ओढवला असून ते आता घटस्पोटासाठी आणि त्यांच्या मुललाच्या कस्टडीसाठी कायदेशीररित्या लढतं आहेत. या सगळ्यात निशाने तिच्या सोशल मीडियावर एक मेसेज देत एक फोटो शेअर केले आहे. निशा तिच्या इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिच्या अकाऊंटवर ती नेहमीच प्रेरीत करणारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र नुकताच शेअर केलेला तिचा फोटो आणि मेसेज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलता है’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहराची पत्नी अभिनेत्री निशा रावलने त्या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  त्यानंतर आता या दोघांनी कायदेशीर मार्ग अवलंभला आहे. आणि आता निशाने मेसेज कॅप्शन शेअर करत एक फोटो शेअर केला आहे.

निशाने या फोटो खाली लिहले की, “मी त्या दरवाज्यातून बाहेर पडले, ज्यात माझ्या त्वचेच्या हाडांनद्वारे नखाच्या साखळ्या होत्या! मी माझ्या जुन्या स्वत:ला मागे सोडले नाही, फक्त ते माझ्या नव्याने सापडलेल्या खांद्यावर नेले, ज्यांच्या शक्तीची जाणीव मला आजवर नव्हती! माझ्या शरीराचा आत्म्याचा आणि मनाचे आभार मान्याचा हा क्षण आहे…कारण त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. आता मी स्वता:ची मैत्राण आहे. आता फक्त एकचं गोष्ट आहे, ती म्हणजे स्वत:वर विषवास ठेवणे.”

निशाने या मेसेजद्वारे असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ती आता खुप स्ट्राँग झाली असून तिने तिच्यावर विषवास ठेवला आहे. आणि एक सक्षम व्यक्ती म्हणून तिला उभे राहायचे आहे. या मेसेज मध्ये ती म्हणते की ती जुनीच निशा आहे मात्र आता तिला फक्त तिच्यातल्या शक्तीची जाणीव झाली आहे. निशाने शेअर केलेला हा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसंच तिच्या कमेंट सेक्शनमध्ये देखील नेटकरी तिला स्ट्रँग राहण्यासाठी प्रेरीत करताना दिसत आहेत.

याआधी १ ऑगस्ट रोजी निशाने एक मिरर सेलफी शेअर केला होता. त्या फोटो खाली तिने “पुन्हा एकदा नवीन सुरवात….”असे कॅप्शन दिले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2021 10:32 am

Web Title: actor karan mehara and wife nisha rawal fight nisha shares pictuer with strong message aad 97
Next Stories
1 “काय होतीस तू काय झालीस तू…”; ‘तारक मेहता…’मधील सोनूचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
2 ही नेमकी लारा दत्ताच आहे का? नेटकऱ्यांचा उडाला गोंधळ…
3 सोनाली कुलकर्णीने शेअर केला बिकिनी लूक, फोटो व्हायरल
Just Now!
X