27 October 2020

News Flash

‘त्या’ एका चुकीमुळे कार्तिक आर्यनला करणकडून डच्चू

'सोनी के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन सध्या या कलाविश्वात आपलं स्थान बनवू पाहात आहे.

कार्तिक आर्यन, kartik

‘सोनी के टिटू की स्वीटी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन सध्या या कलाविश्वात आपलं स्थान बनवू पाहात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. ज्यानंतर प्रेक्षकांपासून ते कलाविश्वापर्यंत बऱ्याच ठिकाणी कार्तिक प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळालं. इतकच नव्हे, तर त्याला बऱ्याच चित्रपटांची विचारणाही करण्यात आली होती.

येत्या काळात तो करिना कपूर खान हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असून, करण जोहरच्या निर्मिती संस्थेअंतर्गत हा चित्रपच साकारला जाणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली, जो एका कन्नड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. एकिकडे या चर्चा सुरु असतानाच ज्या प्रश्नाने डोकं वर काढलं तो म्हणजे कार्तिकसोबतच्या करणच्या प्रोजेक्टचं झालं तरी काय?

‘डेक्कन क्रोनिकल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार कार्तिकच्या जास्त मानधनाच्या मागणीमुळे आणि त्याच्या अतिउत्साही टीममुळे त्याला करणने आगामी चित्रपटातून वगळलं आहे. ज्यामध्ये खिलाडी कुमारचीही महत्त्वाची भूमिका असल्याचं कळत होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिकच्या भूमिकेविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली असली तरीही कोणतीच गोष्ट अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नव्हती. पण, तरीही त्याच्या टीमकडून मात्र करणच्या चित्रपटाचा प्रस्ताव कार्तिकने स्वीकारल्याचं सांगत वेगळ्याच चर्चा पसरवण्यास सुरुवात केली. इतकच नव्हे, तर तो करिनासोबत झळकणार असल्याचंही म्हटलं.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

मुख्य म्हणजे करिनासोबत या चित्रपटातून खिलाडी कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. त्याशिवाय खुद्द कार्तिकनेही या चित्रपटासाठी जास्त मानधनाची मागणी केल्यामुळे आता त्यालाच या प्रोजेक्टमधून वगळण्यात आल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला आपण आघाडीच्या बी- टाऊन कलाकारांच्या यादीत समाविष्ट झालो असून, त्याच अनुशंगाने आपल्याला मानधन मिळावं अशी अपेक्षा करणं कार्तिकला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्याच दिवसांमध्ये महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 1:22 pm

Web Title: actor kartik aaryan lost out karan johars film with kareena kapoor khan for demanding a fat pay cheque
Next Stories
1 Viral Video : सनी देओलच्या डान्सचा हा व्हिडियो पाहिलात? 
2 ‘संजू’नंतर आता ‘सर्किट’च्या भूमिकेत झळकणार रणबीर?
3 Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?
Just Now!
X