03 March 2021

News Flash

Video : सेल्फीला वैतागून अभिनेत्याने फेकला चाहत्याचा फोन

कधाकधी चाहत्यांना कलाकारांच्या रोषाला सामोर जावं लागतं.

चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे लाखोंच्या संख्येने चाहते असतात. त्यामुळे आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री दिसले कि चाहते त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र कधीकधी चाहत्यांची ही इच्छा कलाकारांना डोईजड होते आणि चाहत्यांना कलाकारांच्या रोषाला सामोर जावं लागतं. असाच अनुभव दाक्षिणात्य अभिनेता शिवकुमार यांच्या चाहत्याला आला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता शिवकुमार यांनी काही दिवसापूर्वी मदुराईमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी आपल्या आवडत्या कलाकाराला पाहून त्यांचे चाहते फोटो काढण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र सतत चाहत्यांचा घोळका पाहून शिवकुमार यांनी एका चाहत्याला फटकारले आणि त्याच्या हातातील फोन बाजूला फेकून दिला. या घटनेनंतर हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत असून शिवकुमार यांच्यावर टीका होत आहे.

मधुराई येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये शिवकुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. यावेळी मंचाजवळ पोहोचत असताना शिवकुमार यांचा एक चाहता सेल्फी घेण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. यावेळी फोटोच्या नादात तो शिवकुमार यांचा रस्ता आडवत असल्याचंही त्याच्या लक्षात आलं नाही. हा प्रकार पाहून शिवकुमार यांनी रागाच्या भरात चाहत्याच्या हातातील मोबाईल खाली फेकला.

शिवकुमार यांचा अचानक बदलेला स्वभाव पाहून उपस्थित साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं असून त्यांच्या अशा वागण्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उपस्थितांपैकी काहींनी शिवकुमार यांना चाहत्याची माफी देखील मागण्यास सांगितलं.

‘आठवणी स्मरणात ठेवण्यासाठी फोटो काढणं हे योग्यच आहे. चाहता माझ्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. यात काही वावगं नाही. परंतु मी जरी कलाकार असलो तरी माझंही वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामुळे चाहत्यांनी याचाही विचार करायला हवा. मी गाडीतून उतरल्यानंतर अचानक माझ्यासमोर हे दृश्य घडत होतं. या चाहत्यापूर्वी २० पेक्षा अधिक चाहत्यांनी माझ्या अंगरक्षकांना, वॉलिएन्टर्सला धक्का मारला होता. हे अत्यंत चुकीचं होतं. त्यामुळे हे सारं पाहून माझ्या हातून असं नकळतपणे चाहत्याचा फोन फेकला गेला’, असं शिवकुमार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं.

पुढे ते असंही म्हणाले, ‘कोणत्याही कलाकारासोबत फोटो काढण्यापूर्वी त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. कलाकार म्हणजे कोणती सार्वजनिक वस्तू किंवा मालमत्ता नाही. त्यामुळे कलाकारांना त्यांच्या मान द्या. बाकी माझी कोणतीच तक्रार नाही’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 12:59 pm

Web Title: actor knocks a fans phone
Next Stories
1 या मराठी छायाचित्रकारामुळे दीपिकाचं बॉलिवूडमध्ये पाऊल
2 Video : होणाऱ्या सासूसोबत ‘देसी गर्ल’चे ठुमके
3 डॉ. काशिनाथ घाणेकरांचा अभ्यास न करता सुबोधनं साकारली भूमिका कारण…
Just Now!
X